Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Russian In Goa: रशियन पर्यटक जोडप्याने मध्यरात्रीच्या सुमारास शिवोली परिसरात गोंधळा घातला, मद्यधुंद असलेल्या महिलेले पोलिसांसोबत हुज्जत घातली.
Russian In Goa
Russian In GoaDainik Gomantak

Russian In Goa

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रशियन जोडप्याने रात्रीच्या वेळेस शिवोलीत जोरदार राडा घातला. मध्यरात्री जोडप्याचा सुरु असलेला तमाशा पाहून त्यांच्या मदतीला 108 वैद्यकीय सेवा तसेच, पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या रशियन पर्यटक महिलेने पोलिसांसोबत देखील हुज्जत घातली तसेच, वैद्यकीय मदत देखील नाकारली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, एक रशियन जोडपे शिवोलीत येथील एका मेडिकलसमोर धिंगाणा घालताना दिसत आहे. पर्यटक जोडपे मद्यधुंद अवस्थेत असून, महिलेचा पुरुष जोडीदार मेडिकल समोर नशेत धुत असल्याचे दिसून येत आहे. तर, त्याची जोडीदार महिला त्याठिकाणी गोंधण घालत आहे.

जोडप्याच्या मदतीला 108 ची रुग्णवाहिका, वैद्यकीय कर्मचारी तसेच, स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, महिलेने वैद्यकीय मदत घेण्यास नाकारले शिवाय पोलिसांसोबत देखील हुज्जत घातली. समोर आलेल्या व्हिडिओनुसार, महिला परिसरात मोठ्याने आरडाओरडा करताना दिसत आहेत.

Russian In Goa
Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

महिलेचा पुरुष जोडीदार नशेत धुत असून, त्याला देखील हात लावण्यास महिलेने पोलिस आणि 108 च्या कर्मचाऱ्यांने रोखले. अखेर पिंक फोर्स आणि महिला पोलिसांनी रशियन पर्यटक महिलेला पकडले असता तिने मोठा गोंधळ घातला.

अखेर पोलिसांनी पुरुष रशियन पर्यटकाला जागे करत 108 च्या रुग्णवाहिकेत बसवले. दरम्यान, या दीड ते दोन तासात या सगळ्या घटनेने परिसरात अशांतता निर्माण झाली होती. तसेच, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com