Rama Kankonkar: भरदिवसा जीवघेणा हल्‍ला, कर्नाटकात पळणाऱ्या संशयितांना उचलले; 'रामा काणकोणकर' प्रकरणाचा घटनाक्रम..

Rama Kankonkar Latest News: करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्‍यावर झालेल्‍या प्राणघातक हल्‍लाप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री पाच संशयितांना अटक केली.
social Activist Rama Kankonkar assualt
Rama KankonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्‍यावर झालेल्‍या प्राणघातक हल्‍लाप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री पाच संशयितांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्‍या साहाय्याने हल्‍लेखोरांचा माग काढण्‍यात आला.

संशयितांना पकडण्‍यासाठी पोलिसांची आठ पथके, ३१ कर्मचारी तैनात करण्‍यात आले होते. पोलिस उपनिरीक्षक नितीन नाईक यांच्‍या पथकाने दोडामार्ग बस स्टँडजवळ तिसवाडीतील अँथनी नदार (रा. सांताक्रूझ ३१), फ्रान्‍सिस नदार (रा. सांताक्रूझ ३१) या दोघा संशयितांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. ते रेल्‍वेने कर्नाटकला पळून जाण्याचा विचार करत होते.

तर पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांच्‍या पथकाने सुरेश नाईक (रा. पर्वरी ३१), मिंगेल आरावजो (रा. सांताक्रूझ, २४), मनीष हडफडकर (रा. चोडण २४) या तिघांना रात्री ९च्‍या सुमारास मडगावात अटक केली. आणखी एकजण बेपत्ता असून त्‍याचा शोध सुरू आहे.

अटक केलेले पाचहीजण अट्टल गुन्‍हेगार असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावर करंझाळे येथे जीवघेणा हल्‍ला झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

काणकोणकर अत्‍यवस्‍थ असून, त्‍यांच्‍यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्‍यातून हा प्रकार घडला, असा संशय व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. मात्र, काणकोणकर यांनी पर्वरीतील एका घटनेतून हा हल्‍ला झाल्‍याचे संकेत दिले. ‘तुला राखणदार व्‍हायचे आहे का’ असे शब्‍द हल्‍लेखोरांनी काढल्‍याचे रामा म्‍हणाले.

हल्‍ल्‍याचे सीसीटीव्‍ही फुटेज व्‍हायरल झाले असून, सहा अनोळखी व्‍यक्‍ती रामा यांच्‍यावर केबलने वार करत असल्‍याचे त्यात दिसत आहे. काणकोणकर यांना अवघ्‍या काही मिनिटांत चपलांचा मार देत त्‍यांच्‍या मुखाला शेण फासण्‍यात आले. हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बाहेर पडणाऱ्या काणकोणकर यांच्‍यावर अचानक हल्ला झाल्याने आजूबाजूचे लोकही भांबावले. काणकोणकर यांच्‍यासोबत असणारे सोयरू वेळीप यांनी घटनेसंदर्भात पोलिस तक्रार दिली. मारहाण करून सहाजण दुचाकीवरून पळून गेले. विशेष म्‍हणजे, हल्लेखोरांनी उजळ माथ्याने ही मारहाण केली.

घटनानुक्रम असा...

१ तक्रारदार सोयरू वेळीप (खेपे) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साधारण १२.५५ वाजता आरोपींनी एकत्र कट रचून काणकोणकर यांना जबरदस्तीने अडवले.

२ त्यानंतर केबलने मारहाण करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी संशयितांनी वेळीप यांनाही चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

३ याप्रकरणी संशयितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६(२), १०९, ३५१(३) सह ६१ अन्वये खुनाचा प्रयत्न, कटकारस्थान व धमकी या गुन्ह्यांखाली प्रकरण नोंदविले आहे.

राज्‍यात संतापाची लाट

मारेकरी हे अट्टल गुन्‍हेगार आहेत. पोलिसांनी आठ ते नऊ तासांत छडा लावला. मारण्‍यामागे कारण काय, याचा शोध पोलिस घेत आहेत.

मारहाणीनंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा, उत्‍पल पर्रीकर, प्रकाश वेळीप, गोविंद गावडे यांच्यासह आप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स या राजकीय पक्षांनी घटनेचा तीव्र निषेध केला.

कारवाईचे मुख्‍यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते. त्‍यानुसार पोलिसांनी सूत्रे वेगाने फिरवून संशयितांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.

social Activist Rama Kankonkar assualt
Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश; पाचजणांना अटक, हल्ल्याचे कारण येणार समोर?

त्यांच्याकडे बंदुक होती

काणकोणकर हे हॉटेलमध्ये जेवण करून रस्ता ओलांडत असताना त्यांना अडवून मारले. पळ काढताना त्यांच्या तोंडाला शेणही फासले. उपस्थित लोकांना देखील धमकावून जवळ येऊ दिले नाही. काणकोणकर यांनी सांगितले की, त्यांच्याकडे बंदुक होती आणि याआधी माझ्यावर बांबोळी येथे हल्ला झाला होता, तेव्‍हा त्यातील एकजण आजच्या हल्ल्यातही होता.

social Activist Rama Kankonkar assualt
Rama Kankonkar: ''राखणदाराच्या जागेबद्दल बोलणारे तुम्ही कोण''? आक्रमक प्रश्न करणाऱ्या रामा काणकोणकरला न्यायालयाचा दिलासा

काय घडले?

करंजाळे येथे झाली मारहाण

केबलने मारले, शेणही फासले

पूर्ववैमनस्‍याचा संशय व्‍यक्‍त

राज्‍यभरातून संतापाची लाट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com