गोव्यात होणार 'चंद्रपूर' जिल्हा? तिसऱ्या जिल्हा घेणार अंतिम आकार; मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांची बोलवली बैठक

Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सर्व आमदारांनी सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती विधानसभेचे नवे सभापती गणेश गावकर यांनी दिली आहे.
Goa Third District | Goa News
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेला तिसरा जिल्हा आज (३० डिसेंबर) अंतिम आकार घेण्याची शक्यता आहे. याचा फैसला करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सर्व आमदारांची महत्वाची बैठक बोलवली आहे. नव्या जिल्ह्याचे 'चंद्रपूर' असे नामकरण होण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय सुलभतेसाठी गेल्या अनेक वर्षापासून गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेची मागणी जोर धरत आहे. तसेच, आदिवासीबहूल जिल्हा निर्माण व्हावा यासाठीही राजकीय नेत्यांनी वारंवार भूमिका मांडली आहे. या मागणीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकारात्मकता दर्शवत तिसरा जिल्हा निर्मितीसाठी गेल्या अर्थसंकल्पात ग्रीन सिग्नल दिला. विधानभवनात देखील यावर चर्चा झाली. आता यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे.

Goa Third District | Goa News
महिनाभर रंगणार 'Drishyam 3' शूट, चित्रपटाची स्टारकास्ट येणार गोव्यात; अक्षय खन्ना असेल का? चाहत्यांना अजूनही उत्सुकता

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व आमदरांची तातडीची बैठक बोलवली असून, या बैठकीत तिसऱ्या जिल्ह्याचा अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे. यानंतर सरकारकडून सोपस्कर पूर्ण करुन जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा केली जाईल.

नव्या जिल्ह्याचे चंद्रपूर असे नामकरण केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, या जिल्ह्याचे मुख्यालय कुडचडे येथे उभारले जाऊ शकते. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती समोर येणे अपेक्षित आहे.

दरम्यान, तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी सर्व आमदारांनी सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती विधानसभेचे नवे सभापती गणेश गावकर यांनी दिली आहे. नव्या जिल्ह्यात सावर्डे, सांगे, केपे, कुडचडे आणि काणकोण या तालुक्यांचा समावेश होईल, असेही गावकर म्हणाले.

विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी मात्र तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी घाई केल्याचे म्हटले आहे.

Goa Third District | Goa News
Virat Kohli: '..ये ऐसेही किंग नही है'! विराट कोहलीचे सरावाला प्राधान्य; हजारे करंडकमध्ये दिल्लीसाठी खेळणार 3रा सामना

"तिसऱ्या जिल्ह्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये समिती स्थापन करण्यात आली, या समितीने तयार केलेला अहवाल यापूर्वी दाखविण्यात आला नाही. तो आत्ता मुख्यमंत्र्यांकडे मागितल्यानंतर दाखवला जाणार आहे. आम्ही तिसऱ्या जिल्ह्याच्या विरोधात नाही पण, हा निर्णय घाई घाईत घेण्यात आला. राज्यासमोर आर्थिक अडचणी असताना अहवाल सार्वजनिक करणे अपेक्षित होते", असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com