महिनाभर रंगणार 'Drishyam 3' शूट, चित्रपटाची स्टारकास्ट येणार गोव्यात; अक्षय खन्ना असेल का? चाहत्यांना अजूनही उत्सुकता

Akshaye Khanna Drishyam 3: चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नाच्या या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली.
Drishyam 3
Drishyam 3Dainik Gomantak
Published on
Updated on

Drishyam 3 shoot Goa: बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम ३' सध्या चित्रपटाच्या कथेपेक्षा त्यातील अंतर्गत वादांमुळे अधिक चर्चेत आलाय. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना, अभिनेता अक्षय खन्नाने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली. मात्र, निर्मात्यांनी वेळ न घालवता अक्षय खन्नाच्या जागी आता प्रतिभावान अभिनेता जयदीप अहलावत याची निवड केली असून, चित्रपटाचे पुढचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

मानधनाचा वाद आणि निर्मात्यांची नाराजी

चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नाच्या या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली. अक्षय खन्नाने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर 'दृश्यम ३' साठी अवाजवी मानधनाची मागणी केली होती, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.

"अक्षय खन्नापेक्षा जयदीप अहलावत या भूमिकेसाठी अधिक योग्य आहेत," असे स्पष्ट करत पाठक यांनी अक्षयवर ताशेरे ओढले. दरम्यान, दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनीही आपली प्रतिक्रिया देताना अक्षय खन्नाला 'एकट्याने चित्रपट चालवून दाखवण्याचे' खुले आव्हान दिले आहे.

Drishyam 3
Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

८ जानेवारीपासून गोव्यात चित्रीकरणाचा प्रारंभ

वाद बाजूला सारून चित्रपटाची टीम आता कामाला लागली आहे. 'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसऱ्या भागाचेही मुख्य चित्रीकरण गोव्याच्या निसर्गरम्य आणि रहस्यमय पार्श्वभूमीवर होणार आहे.

८ जानेवारीपासून गोव्यामध्ये एक महिन्याचे दीर्घ वेळापत्रक सुरू होणार असून, हे चित्रीकरण फेब्रुवारी अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकात अजय देवगणसह तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांसारखे महत्त्वाचे कलाकार सहभागी होणार आहेत.

विजय साळगावकर आणि नव्या पात्राचा संघर्ष

'दृश्यम'च्या पहिल्या भागात तब्बूने (मीरा देशमुख) साळगावकर कुटुंबाची कोंडी केली होती, तर दुसऱ्या भागात अक्षय खन्नाने तपास पुन्हा सुरू करून थरार निर्माण केला होता. आता तिसऱ्या भागात जयदीप अहलावत हे पात्र विजय साळगावकरला कसे अडचणीत आणते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रदर्शनाची तारीख आणि निर्मात्यांची अधिकृत घोषणा

स्टार स्टुडिओ १८ आणि पॅनोरमा स्टुडिओजची निर्मिती असलेला 'दृश्यम ३' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ही तारीख 'दृश्यम' चाहत्यांसाठी खास आहे, कारण चित्रपटातील कथेचा मूळ गाभा याच तारखेभोवती फिरतो.

अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर'च्या यशाचा आनंद घेत असताना आणि त्याच्या सिक्वेलची तयारी करत असताना, 'दृश्यम ३' मधून त्याची एक्झिट ही प्रेक्षकांसाठी धक्कादायक असली तरी, जयदीप अहलावतच्या समावेशाने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com