Sacorda Shiva Temple: 6 दशकांनी उजळला महादेव लिंगाचा परिसर! उखळ - आगळो मंदिर परिसरात पथदीपांची सोय

Ukhal Aglo Mahadev Temple Sacorda: हे महादेवाचे लिंग प्रसिद्ध असून भाविकांकडून श्रीचे पूजन केले जाते. याशिवाय दर श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती असते.
Ukhal Aglo Mahadev Temple Sacorda
Ukhal Aglo Mahadev Temple SacordaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील उखळ - आगळोत भागात महादेवाचे लिंग असलेल्या छोटेखानी मंदिराच्या वाटेवर पथदीपांची सोय करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ तसेच भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. या सुविधेचे उद्‍घाटन पंच सदस्य महादेव शेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

हे महादेवाचे लिंग प्रसिद्ध असून भाविकांकडून श्रीचे पूजन केले जाते. याशिवाय दर श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती असते. गेली सहा दशके हा भाग रात्रीच्यावेळी पूर्णपणे अंधारात बुडून जायचा, पण स्थानिक पंच सदस्य महादेव शेटकर यांच्या प्रयत्नांमुळे हा परिसर उजळून निघाला आहे.

त्यासाठी स्थानिक साकोर्डा पंचायत मंडळ तसेच आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे साहाय्य पंच सदस्य महादेव शेटकर यांना मिळाले.

Ukhal Aglo Mahadev Temple Sacorda
Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

विशेष म्हणजे वीज खात्याचे सहायक अभियंता निळकंठ सावंत, कनिष्ठ अभियंता जीतेंद्र जल्मी तसेच वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी उखळ - आगळोत भागात नव्याने वीज खांब व वीजवाहिन्या उभारण्यासाठी तत्परता दर्शवली, असे महादेव शेटकर म्हणाले.

Ukhal Aglo Mahadev Temple Sacorda
Kerala Temple Crocodile: मंदिराचे रक्षण करणारी, प्रसाद खाऊन राहणारी 'मगर'; केरळच्या श्रीअनंत पद्मनाभ मंदिरातील अद्भुत गोष्ट

उखळ - आगळोत येथील या देवस्थानात पूर्वी विजेची सोय नव्हती, पण महादेव शेटकर पंच म्हणून निवडून आल्यानंतर या छोट्याशा मंदिरात विजेची जोडणी घेण्यात आली आणि आता पथदीप उभारण्यात आल्याने भाविकांची चांगली सोय झाल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com