Goa: CM सावंत राज्यपालांना पत्र लिहणार का मंत्री गावडेंना राजीनाम्याची संधी देणार? राज्यपाल बुधवारी गोव्यात

Goa Politics News: कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी समाज माध्यमांवरून सरकारवर दबाव वाढू लागला आहे.
Govind Gaude controversy latest update
Govind Gaude cabinet removalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्यपालांना पत्र लिहिणार की गावडे यांना राजीनाम्याची संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गावडे सध्या गोव्याबाहेर असून २९ मे रोजी ते गोव्यात परततील. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे बुधवारी (२८ मे) गोव्यात पोहोचणार आहेत.

मंत्री म्हणून गावडे यांचे काम थांबवावे, यासाठी पक्षातूनच मुख्यमंत्र्यांवर वाढता दबाव आहे. गावडे यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल भाजपच्या नेत्यांनी कार्यकत्यांनी घेतली असून मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी, यासाठी त्यांनी रेटा वाढवणे सुरू केले आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी समाज माध्यमांवरून सरकारवर दबाव वाढू लागला आहे.

Govind Gaude controversy latest update
Goa Politics: भ्रष्टाचारी मंत्र्याला हकलण्याची हिंमत नसलेल्या मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा; माणिकराव ठाकरे कडाडले

यानिमित्ताने अकार्यक्षमंत्र्यांनाही वगळा, असा सल्ला नेटकरी मुख्यमंत्र्यांना देऊ लागले आहेत. दरम्यान, पुढील काळात मंत्रिपदी कुणाला संधी मिळू शकते, या संदर्भातही अटकळ बांधली जात असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. मडगावचे आमदार कामत व सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे.

'कला अकादमी'वरून भरपूर टीका

१) कला अकादमी नूतनीकरणाच्या निमित्ताने झालेल्या घोळावरूनच गावडे यांच्यावर समाज माध्यमांवर टीकेची झोड अधूनमधून उठत असते.

२) आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावडे यांच्यावर कारवाई होईल, असे सांगितल्याने गावडे यांच्यावर टीका करणारे खुशीत आहेत.

३) अनेकांनी या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची झाडाझडती घ्यावी. अकार्यक्षम मंत्र्यांना वगळून नव्याने संधी द्यावी, असे मत व्यक्त करणे सुरू केले आहे.

४) ४ आणखी कोणाकोणाला मंत्रिमंडळातून वगळले जाणार आणि कोणाला संधी मिळेल याची एक वेगळी चर्चा समाज माध्यमावर सध्या रंगू लागली आहे.

Govind Gaude controversy latest update
Govind Gaude: अहंभाव, उन्मादाने भरलेल्या कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंना हटवाच!

विरोधक आक्रमक

गावडे प्रकरणावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. पणजीतील काँग्रेस भवनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले, भाजप मंत्र्यांमधील अंतर्गत कलह पाहता सुशासन आहे असे कसे म्हणावे? कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गावडे यांच्या आरोपांवर सरकारने उत्तर द्यावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com