Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News : बिटस पिलानीत १ मेगावॅट विजेची निर्मिती करणार

Panaji News : यामुळेच बिटस पिलानी शैक्षणिक संकुलाच्या ऊर्जेची गरज सौर ऊर्जेतून भागवण्याचे ठरवण्‍यात आले आहे.
Published on

Panaji News :

पणजी, झुआरीनगर येथील बिटस पिलानी हे शैक्षणिक संकुल ऊर्जेच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होणार आहे. १ मेगावॅट विजेची निर्मिती सौर पॅनेल्स वापरून केली जाणार आहे.

टाटा सौर ऊर्जा यांच्याशी यासाठी संस्थेने करार केला आहे. सध्या संस्थेत २२५ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती सयंत्र बसवलेले आहे. त्यातून दररोज ९०० ते १ हजार युनिट वीज तयार होते.

शैक्षणिक संकुलातील वर्ग, वसतीगृहे, प्रयोगशाळा, सभागृहे यांची वाढती वीज मागणी लक्षात घेता १ मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा निर्मिती संयंत्र बसवले जाणार आहे. या ऊर्जा निर्मितीमुळे १०० टन कार्बनचे उत्सर्जन कमी होणार आहे.

Panaji
Goa Fire Case: रेवोडात अग्नितांडव! शेकडो काजू कलमे जळून खाक, हजारोंचे नुकसान

संस्थेचे संयुक्त कुलसचिव शैलेश मोहंती यांनी या करारावर संस्थेच्यावतीने स्वाक्षरी केली आहे. संकुलाच्या संचालक प्रा. सुमन कुंडू यांनी याविषयी सांगितले, की शैक्षणिक संस्थांनी स्वच्छ, हरित ऊर्जेचा वापर केला पाहिजे. ही शैक्षणिक संकुले पथदर्शी असली पाहिजेत.

यामुळेच बिटस पिलानी शैक्षणिक संकुलाच्या ऊर्जेची गरज सौर ऊर्जेतून भागवण्याचे ठरवण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com