Amit Patkar: म्हादईचे डायव्हर्जन रोखणार का? हे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करावे...

मोदींच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अमित पाटकर यांचे मोदींना दहा सवाल
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak

Amit Patkar: गोव्याची जीवनदायिनी समजल्या जात असलेल्या म्हादई नदीचे कर्नाटक सरकारने चालवलेले डायव्हर्जन रोखणार का? असा सवाल काँग्रेस नेते अमित पाटकर यांनी विचारला आहे.

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आज, गुरूवारी गोव्यात येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाटकर यांनी गोव्याशी संबंधित दहा सवाल केले आहेत. त्यातून मोदींनी गोमतकीयांसमोर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

Amit Patkar
National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 3 खेळाडू जखमी; महाराष्ट्राच्या खेळाडूवर शस्त्रक्रिया

अमित पाटकर यांनी विचारलेले प्रश्न...

  • म्हादई नदीचे पाणी वळविण्याचे कर्नाटकने सुरू केलेले प्रयत्न रोखणार का?

  • उच्च न्यायालयाने राज्य सरकारला म्हादई व्याघ्र क्षेत्र घोषित करा, असे आदेश दिले होते. त्याची मुदत संपली आहे. तर मोदी हे व्याघ्र क्षेत्र जाहीर करणार का?

  • गोव्याला कोल हब बनविण्याचे थांबवणार का?

  • 2014 मध्ये तुम्ही गोव्याला विशेष दर्जा देणार, असे आश्वासन दिले होते. ते कधी पूर्ण करणार?

  • 2014 मध्ये तुम्ही गोव्यात पुन्हा मायनिंग सुरू होईल, असे सांगितले होते. पण दहा वर्षे होत आली तरी त्याची सुरवात झालेली नाही. ते सुरू करणार की हा देखील एख जुमला आहे?

Amit Patkar
Goa Crime: धक्कादायक! बापासह दोन मुलांचा अल्पवयीन दत्तक मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल
  • सोने तस्करीत सहभागी असलेल्या गोव्याच्या मंत्र्याला कधी अटक करणार?

  • बेरोजगार युवकांच्या प्रमाणात गोवा आघाडीवर का आहे?

  • भाजपचे मंत्री स्वतःच्या फायद्यासाठी जमिनीचे रूपांतर करणे थांबवणार का?

  • राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नसणे, महिलांवर अत्याचार, राज्यातील अपघातातील मृत्यू यासाठी कोण जबाबदार आहे?

  • हायकोर्टाने राज्यातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्य सरकारला आदेश दिले होते. याबाबत पावले उचलणार का?

असे सवाल काँग्रेस नेते अमित पाटकर यांनी विचारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com