Sattari: पिकांच्या नासाडीमुळे शेतकरी हवालदिल! गवे, रानडुकरे, माकडांचा वाढला मुक्त संचार; सुपारीची रोपे भुईसपाट

Valpoi Nagargao: नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या रानटी प्राण्यांकडून शेती-बागायतीमधील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून शेतकऱ्यांसाठी ही चिंताजनक बाब बनली आहे.
Sattari Valpoi Wildlife conflict
Sattari Valpoi Wildlife conflictDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या रानटी प्राण्यांकडून शेती-बागायतीमधील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून शेतकऱ्यांसाठी ही चिंताजनक बाब बनली आहे.

नवीन लागवड केलेली सुपारीची रोपे उखडून टाकून जमीनदोस्त केली जात आहेत. गवे, रानडुक्कर, खेती, माकड अशा वन्य प्राण्यांकडून बागायतीमधील पिकांची नासाडी करण्याचे प्रकार वाढलेआहेत. दोन-तीन वर्षांच्या पोफळीच्या (सुपारी) झाडांची रानडुकरांकडून नासाडी केली जात आहे.

अतिशय मेहनतीने लागवड केलेल्या पोफळीच्या रोपांची हे वन्य प्राणी नासाडी करतात. त्यासाठी झालेला कामगारांचा खर्च, पाणी, खत सर्व काही वाया जात आहे. त्यामुळे बागायतदार वर्गाला वारंवार रानटी प्राण्यांमुळे आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे सत्तरी तालुक्यातील शेतकरी, बागायतदार हैराण झाले असून ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

Sattari Valpoi Wildlife conflict
Valpoi News: वाळपईत प्राण्यांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई; दोघांना अटक

शेतकऱ्यांचे बिघडले अर्थकारण!

सरकारने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न केल्याने येथील लोकांचे जीवन खडतर झाले आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांचे अर्थकारण, कृषी व्यवस्थापन बिघडले आहे. यातून सावरावे कसे, या विवंचनेत शेतकरी आहेत. जंगली प्राण्यांनी उत्पन्न फस्त करायचे व कष्टकरी लोकांनी केवळ नुकसान सहन करायचे, असेच चित्र दिसते. नगरगाव, आंबेडे, बांबर, नानोडा, ब्रह्मकरमळी, धावे, हेदोडे, भोंबेडे आदी गावांमध्ये वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे.

Sattari Valpoi Wildlife conflict
Sattari: रानटी प्राण्यांचे घरात आक्रमण! गवे, माकडांचा अंगणात वावर; सत्तरीवासीय हवालदिल

बंदोबस्तासाठी सरकार उदासीन

सरकारने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या या उपद्रवी प्राण्यांकडे डोळेझाक केली जात आहे. सरकारची उदासीनता शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. सध्या सत्तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गवे, रानडुकरे, खेती, माकड यांचा मुक्त संचार दिसून येतो. बागायतीत आणि रस्त्यावरही गवे सर्रासपणे फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे लोकांना बागायतीत जाणे धोकादायक ठरत आहे.

नगरगाव पंचायत क्षेत्रातील अनेक गावांमध्ये रानटी प्राण्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांना त्रस्त केले आहे. बागायतीत गवे, रानडुक्कर, खेती, माकड, शेकरू यांचा वावर नेहमीच दिसून येतो. त्यामुळे भविष्यात शेती- बागायती करणे कठीण होणार आहे.

रणजीत राणे, बागायतदार, धावे तार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com