Valpoi News: वाळपईत प्राण्यांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई; दोघांना अटक

Illegal transport of pigs Goa: बेळगावहून मडगाव येथे डुकरांची दोन पीकअप रिक्षातून वाहतूक करत असताना केरी चेकपोस्टवर पोलिसांनी अडविली.

Pig transport crackdown goa

वाळपई: बेळगावहून गोव्यात डुकरांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी कारवाई करत दोन पीकअप रिक्षासह ५३ डुकरांना ताब्यात घेत दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, बेळगावहून मडगाव येथे डुकरांची दोन पीकअप रिक्षातून वाहतूक करत असताना केरी चेकपोस्टवर पोलिसांनी अडविली. त्यावेळी वाहनात डुक्कर असल्याचे आढळून आले. जेव्हा चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे वा परवानगी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जीवन शिप्री (आश्रय कॉलनी, रुक्मिणी नगर, बेळगाव-कर्नाटक) आणि सागर जाधव (धनू नगर, धारवाड-कर्नाटक) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. या दोघांना २३ डुकरे बोलेरो पीकअप वाहन (क्रमांक केए २२ एए ६१४८) आणि ३० डुकरे टाटा रिक्षा (क्रमांक केए २५ एसी १३१९) मध्ये अस्वच्छ आणि अतिशय अमानवीय स्थितीत वाहतूक करताना आढळून आले. ही डुकरे बेळगावहून मडगाव, फोंडा, आगशी येथे घेऊन जात होते. सर्व प्राणी हे घरडुक्कर होते. ही कारवाई सोमवारी पहाटे ४ वा.च्या दरम्यान करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सुरू असून दोन्ही वाहने पंचनामा करून जप्त करण्यात आली आहेत. तसेच दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com