PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल

Traffic Advisory For Goa Over PM Narendra Modi's Goa Visit: भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या (शनिवारी) दक्षिण गोव्यात सांकवाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे.
PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल
Major Traffic Change In South Goa Due To PM Modi's Loksabha RallyDainik Gomantak

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या (शनिवारी) दक्षिण गोव्यात सांकवाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सांकवाळ येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. तसेच, मोदीच्या सभेसाठी तुम्ही जाणार असाल, तरच तुम्हाला या भागात प्रवेश दिला जाणार आहे.

PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल
PM मोदी, CM सावंत यांच्यावर कारवाई करा; गोवा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे का केलीय तक्रार?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशानुसार, शनिवारी दाबोळी विमानतळ जंक्शन ते बिर्ला क्रॉस जंक्शन आणि बिर्ला टायटन जंक्शन ते दाबोळी विमानतळ जंक्शन हे रस्ते दुपारी 1 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहतील. सभेला जाणाऱ्या लोकांनाच या मार्गावर प्रवेश दिला जाईल.

दरम्यान, वास्कोकडे जाणारी वाहतूक बिर्ला क्रॉस जंक्शन येथून शरयू टोयोटा हमरस्ता-कुठ्ठाळी जंक्शन-चिखली जंक्शन मार्गे वळवण्यात येईल. तर वेर्णा औद्योगिक वसाहत, पणजी, मडगाव येथे जाणारी वाहतूक दाबोळी विमानतळ जंक्शन येथून वळवून चिखली जंक्शन-कुठ्ठाळी जंक्शन मार्गे पुढे सोडली जाईल. तसेच, शनिवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 533 वर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

वरुणापुरी जंक्शन ते बिर्ला क्रॉस जंक्शन आणि एमईएस जंक्शन ते क्विन जंक्शन या रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सांकवाळ येथे उद्या (शनिवारी, दि.27) मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बिर्ला मंदिराच्या समोरील खुल्या जागेत सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.

मोदींच्या सभेला राज्यभरातून सुमारे 50 हजारपेक्षा जास्त नागरिक हजर राहतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सादानंद तानावडे यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com