Widows in Goa
Widows in GoaDainik GOmantak

ऐतिहासिक; गोव्यात यापुढे विधवांनाही मिळणार सन्मान!

महाराष्ट्रातील हेरवाडनंतर कोरगाव आणि धारगळ पंचायतींचा महत्त्वपूर्ण ठराव
Published on

मोरजी : गोव्यात यापुढे विधवा महिलांची धारगळ ग्रामपंचायत क्षेत्रात हेळसांड होणार नाही. त्यांना समाजात आदराने वागवले जाईल, या प्रा. भारत बागकर यांनी मांडलेल्या ऐतिहासिक ठरावाला पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते संमती देण्यात आली. या ठरावाला श्‍याम धारगळकर यांनी अनुमोदन दिले.

गोव्यातील कोरगाव ग्रामसभेमध्येही अशाच प्रकारचा ठराव माजी सरपंच तथा पंचसदस्य स्वाती गवंडी यांनी मांडला. त्याला विनिता मांद्रेकर यांनी अनुमोदन दिले. पतीच्या निधनावेळी त्यांचे कुंकू पुसले जाणार नाही, त्यांचे मंगळसूत्र काढले जाणार नाही. हातातील बांगड्या फोडल्या जाणार नाहीत. पायातील वेढे काढले जाणार नाहीत. त्यांना कधीच अशुभ मानले जाणार नाही. शुभकार्याला त्यांना इतर महिलांप्रमाणेच मानाचे आमंत्रण असेल, असे ठरवण्यात आले.

सभेमध्ये पुंडलिक धारगळकर, अवेलीनो रॉड्रिग्स, श्‍याम धारगळकर यांनीही विचार मांडले. गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून दीपाली काजोळी उपस्थित होत्या.

Widows in Goa
हरमलच्या तनिशाची मनाला चटका लावणारी ‘एक्झिट’

व्यापक जनजागृतीची मागणी

कोरगाव ग्रामसभेत हा ठराव चर्चेत आल्यानंतर उपस्थित पत्रकार प्रकाश तळवणेकर यांनी गावात विधवांना हिणवण्याची प्रथा नाही किंवा विधवांचा कोणीही अपमान करत नाही, असे सांगितले. पण पती निधनानंतरची गैरप्रथा बंद करायची असेल तर व्यापक जनजागृती करावी किंवा महिला मंडळांकडे हा विषय न्यावा, अशी सूचना करून कोरगावात विधवेला हिणवण्याची प्रथा नसल्याचा दावा केला.

हेरवाडवासीयांचे गोव्यात अनुकरण

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावच्या पंचायतीने सर्वप्रथम विधवांच्या संदर्भातील या प्रथेच्या विरोधात ठराव मंजूर केल्यानंतर हा विषय सर्वत्र चर्चेला आला होता. त्याचाच एक भाग म्हणून कोरगाव ग्रामसभेमध्ये माजी सरपंच तथा पंच सदस्य स्वाती गवंडी यांनी हा ठराव मांडला, तर विनिता मांद्रेकर यांनी त्याला अनुमोदन दिले. या ठरावाला इतर पंचांनीही पाठिंबा दर्शविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com