हरमलच्या तनिशाची मनाला चटका लावणारी ‘एक्झिट’

पट्टीची जलतरणपटू, तरीही काळाने ओढले
Tanisha Thakur News
Tanisha Thakur NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कुडासे-दोडामार्ग येथील बंधाऱ्यावर बुडून मृत्यू पावलेली हरमलची तनिशा ठाकूर (वय 13) ही पट्टीची जलतरणपटू. अनेक जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसेही तिने पटकावली आहेत. असे असतानाही तिचा बुडून दुर्दैवी अंत व्हावा, ही अनाकलनीय गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तनिशावर हरमल येथे, तर तिचे ताळगाव येथील मामा विजय पाळयेकर (वय 55) यांच्यावर सांत इनेज-पणजी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Tanisha Thakur dies after drowning in Goa)

Tanisha Thakur News
गोव्यात इलेक्ट्रिक बसचं तिकीट जास्त; प्रवाशांमध्ये नाराजी

कुडासे-दोडामार्ग येथील बंधाऱ्यावरील पाण्यात आंघोळ करताना दुर्गावाडी-ताळगाव येथील प्रसिद्ध वकील विजय आनंद पाळयेकर आणि त्यांची हरमल येथील भाची तनिशा ठाकूर या दोघांचा शनिवारी मृत्यू झाला. ॲड. विजय पाळयेकर यांच्या मृत्यूची घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.

ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि स्थानिक पंचसदस्यांसह विविध स्तरांवरील मान्यवरांनी पाळयेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पाळयेकर यांचा जनमानसाशी असलेला जिव्हाळा, आपुलकी यांमुळे ते सर्व स्तरांवर सुपरिचित होते. ते उत्कृष्ट खेळाडू होते. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ. इतरही खेळ प्रकारांतही ते रममाण होत. वकिली क्षेत्रातील त्यांचे सहकारी, मित्र यांनीही त्यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. पाळयेकर हे शांत, संयमी स्वभावाचे, सर्वांत मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्त्व होते. काळानुसार परिस्थिती बदलली, परंतु त्यांनी आपल्या मूळ स्वभावात कधीच बदल केला नाही, अशी प्रतिक्रिया वकील हरीश भंडारी यांनी व्यक्त केली. ॲड. पाळयेकर हे मला गुरुस्थानी होते. त्यांनी मला वकिली क्षेत्रातील धडे शिकवले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे ते सर्वांना जवळचे वाटत, असे ॲड. वेदराज तोरसकर यांनी सांगितले.

Tanisha Thakur News
मडगावमधील न्यू मार्केटची दुरवस्था; व्यापारी त्रस्त

नृत्य, वादन कलेत तनिशा होती पारंगत

तनिशा ही हुशार विद्यार्थिनी होती. तिचे वडील गोकुळदास हे वेर्णा खासगी कंपनीत नोकरी करतात, तर तिची आई महसूल खात्यात नोकरीस आहे. सध्या ती ताळगाव येथे राहायची. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसांत ती हरमलात यायची. शाळेतील उपक्रमांत तसेच अभ्यासात ती हुशार होती. उत्कृष्ट जलतरणपटू तसेच हुबेहूब चित्रे काढणे, हार्मोनियम, नृत्य, वादन कलेत पारंगत होती. तिच्या निधनामुळे ठाकूर परिवार पुरता हादरला आहे.

तनिशा ठाकूर हिच्या पार्थिवावर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी तनिशाचा मृतदेह आणल्यानंतर वाड्यावरील लोकांनी आणि तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. हरमल गावावर शोककळा पसरली होती. आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री रमाकांत खलप, सरपंच मनोहर केरकर यांनी ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com