Margao News: व्यापाऱ्यांच्या हितासाठी बाबू उतरले आखाड्यात

Margao News: मडगाव पालिकेच्या पायऱ्यांवरच मांडला ठिय्या
Margao News
Margao NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News: माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपले बंधू राजेंद्र आजगावकर, नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर, गांधी मार्केट विक्रेते संघटनेचे पदाधिकारी व इतर विक्रेत्यांसमवेत मंगळवारी सकाळी मडगाव पालिका कार्यालयावर धडक दिली.

Margao News
Goa Recruitment: ‘क’ वर्ग पदभरती : आयोगाने कसली कंबर

मात्र, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नसल्याने मुख्य दरवाजावर तसेच पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवरच त्यांनी ठिय्या मारला. यावेळी पालिका परिसर व इमारतीच्या प्रत्येक दरवाजावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्यामुळे अनुचित घटना घडली नाही. अर्ध्या तासानंतर नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर हे आल्यावर बाबू आजगावकर यांनी मोजक्या विक्रेत्यांसह त्यांची भेट घेतली.

Margao News
Goa Suicide Case: हडफडे येथे 26 वर्षीय परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मडगाव परिसरात रस्त्याच्या बाजूला बेकायदा विक्रेते असून त्यांच्याकडून सोपो घेऊ नये, तसेच त्यांना तिथे बसू देऊ नये, गांधी मार्केटमधील अर्धवट असलेले छप्पराचे काम पूर्ण करावे, तेथील विक्रेत्यांना वीजपुरवठा करावा, शौचालय दुरुस्त करून स्वच्छ ठेवावे, कर्नाटकमधून जे भाज्या-फुले घेऊन येतात, त्यांच्यावर निर्बंध घालावेत, स्टेशन रोडवरील चोर बाजार बंद करावा, पॉवर हाऊस, रावणफोंड येथील बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले की, संपूर्ण गांधी मार्केटचा ‘सुडा’तर्फे कायापालट केला जाईल. आमदार दिगंबर कामत यांनी यापूर्वीच त्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

...अन्यथा पुन्हा मोर्चा काढणार

पत्रकारांशी बोलताना बाबू आजगावकर म्हणाले, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेऊन कायदेशीर विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. जर आमच्या मागण्या 15 दिवसांत मान्य झाल्या नाहीत तर परत मोर्चा काढण्याचा आमचा निर्धार आहे.

तांबड्या भाजीला मज्जाव

गांधी मार्केटमध्ये इतर राज्यांतून येणारी तांबडी भाजी विकली जाणार नाही, असे बाबू आजगावकर यांनी यावेळी सांगितले. गांधी मार्केटमध्ये केवळ गोव्यात पिकलेल्या भाज्या विकल्या जातील, असेही आजगावकर यांनी ठणकावून स्पष्ट केले.

गांधी मार्केट अर्धा दिवस बंद

मोर्चामुळे गांधी मार्केटमधील विक्रेत्यांनी व्यवहार बंद ठेवून नगरपालिकेचा रस्ता धरला. सुमारे 300 विक्रेत्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. मोर्चामुळे मंगळवारी गांधी मार्केट अर्धा दिवस बंद राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com