तृणमूल काँग्रेसच्या बॅनरची चिरफाड का? निवडणूक आयुक्तांनी निष्पक्ष असावे

हे सर्व कुणी करायला लावले? याला जबाबदार कोण?
Trinamool Congress
Trinamool CongressDainik gomantak
Published on
Updated on

निवडणूक आयुक्तांनी मतदानाशी संबंधित साहित्य काढताना निष्पक्ष असावे व सर्वांना समान न्याय द्यावा अशी मागणी, तृणमूल काँग्रेसचे दाबोळीचे नेते केनथ सिल्वेरा यांनी केले. टीएमसीचे बॅनर काढले जात असताना मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत यांचे भाजपचे होर्डींग्स विमानतळावर अजूनही अस्तित्वात असल्याचे सांगून, यावर आक्षेप घेतला.

निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकीची तारीख घोषित करताच राज्यात आचारसंहिता ही लागू झाली आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय (Political) पक्षांचे बावटे, बॅनर्स, पोस्टर्स हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Trinamool Congress
'भाजप या देशाची लोकशाही नष्ट करण्यासाठी षडयंत्र रचतेय'

दरम्यान, मुरगाव तालुक्यात चिखली उतरणीवर दाबोळी विमानतळ परिसरात तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) बॅनरचे तसेच होर्डिंग वरील बॅनरची चिरफाड करून ठेवली आहे. तसेच काही बॅनर्स येत नसल्याने प्रमुख नेत्यांच्या फोटोच्या तोंडावर काळे फासले आहे. तर भाजपचे ख्रिसमस शुभेच्छा फलक तसेच ठेवण्यात आले आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री यांचा फोटो आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस दाबोळीचे नेते केनथ सिल्वेरा यांनी याविषयी आक्षेप घेताना, निवडणूक आयुक्तांनी मतदानाशी संबंधित साहित्य काढताना निष्पक्ष असावे असा सल्ला देताना, सर्वांना समान न्याय देण्याचे आवाहन केले. निवडणूक आयुक्तांनी भाजपशी एकनिष्ठ न राहता सर्व राजकीय पक्षांना समान न्याय द्यावा. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या बॅनर्स, होल्डिंगची चिरफाड करण्यात आली. मात्र या बॅनरजवळ असलेल्या भाजपच्या (BJP) बॅनरना हात लावण्यात आला नाही. तृणमूल काँग्रेसच्या बॅनरची चिरफाड का?

Trinamool Congress
'भाजप या देशाची लोकशाही नष्ट करण्यासाठी षडयंत्र रचतेय'

तसेच काही बॅनर्सवर ममता दीदींच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. हे सर्व कुणी करायला लावले? याला जबाबदार कोण? असा सवाल करताना निवडणूक (Election) आयोगाने तरी यावर बारकाईने लक्ष देऊन निष्पक्ष राहून आपली सेवा बजवावी व सगळ्याच पक्षांना समान न्याय द्यावा. असले घाणेरडे कृत्य करू नये असे आवाहन केनथ सिल्वेरा यांनी करून तृणमूल काँग्रेसच्या बॅनरची केलेली चिरफाड पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com