Leopard Caught At Fatorpa: फातर्पा येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता.
अखेर, बिबट्या या जाळ्यात अडकला असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी वांते- फातर्पा येथे हा सापळा रचण्यात आला होता.
या बिबट्या बाबत स्थानिकांनी वन खात्याकडे तक्रार नोंदविण्यात आल्यावर खात्याने गावातील झाडीत पिंजरा लावून ठेवला होता.
आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या त्यात सापडला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नंतर या बिबट्याची बोंडला येथे रवानगी करण्यात आली.
वांते- फातर्पा परिसरातील स्थानिक या भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याची तक्रार केली होती. वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. वनविभागाने याप्रकरणी दखल घेत वांते येथे सापळा रचला होता.
सदर बिबट्या पूर्ण वाढ झालेला होता आणि लोकवस्तीत त्याचा संचार सुरू झाल्याने लोकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या बिबट्याला जेरबंद केल्या बद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.