Vasco News: PoP च्या मूर्ती का नको? 'हा' घ्या पुरावा; वास्कोत गणेशोत्सवाच्या नऊ महिनान्यानंतर समोर आली घटना

सध्या ते तळे सुकलेले असल्याने मूर्ती ठळकपणे दिसू लागल्याने हा चर्चेचा विषय ठरला
Vasco News:
Vasco News:Dainik Gomantak

Vasco News पाले कासावली येथील शेतजमीनीतील तळ्यात नऊ महिन्यांनंतरही नष्ट न झालेल्या गणेशमूर्ती अखेर पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. दोन दिवसांपूर्वीच हा प्रकार उघडकीस आला होता.

पाले कासावलीच्या या तळ्यात दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचाही समावेश असतो. अशा गणेशमूर्ती नष्ट होत नाहीत.

त्या जशाच्या तशाच पाण्यात राहात. यंदा हा प्रकार गंभीरपणे समोर आला आहे. नऊ महिन्यानंतरही या मूर्ती मातीत मिसळलेल्या नाहीत.

Vasco News:
Explained: कॅसिनोमुळे पणजीच्या बजेट हॉटेल मालकांना कसा होतोय फायदा?

सध्या ते तळे सुकलेले असल्याने गणेश मूर्ती ठळकपणे दिसू लागल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकारांची माहिती वेर्णा पोलिसांना स्थानिक लोकांनीच दिली.

त्यामुळे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी पंचनामा करून त्या गणेश मूर्ती ताब्यात घेतल्या आहेत. या गणेश मूर्तीबाबत पुढील निर्णय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घेण्यात येणार आहे.

Vasco News:
Goa CET 2023: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! GCETचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर

दरम्यान, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती पाण्यात प्रदूषण निर्माण करतात व त्या मूर्ती नष्टही होत नसल्याने अशा प्रकारच्या मूर्तीचे पूजन करणे टाळावे व मातीच्याच मूर्ती वापराव्यात असे आवाहन स्थानिक भाविकांनी व पोलिसांनीही गणेश भक्तांना केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com