पाच हजारांसाठी जनतेची चाललीय फरफट!

लाभार्थ्यांची दिशाभूल : म्‍हणे सत्ताधाऱ्यांनी दिलेले अर्ज ग्राह्य, अन्‍य अर्ज फेटाळण्‍याची भीती
Goa: Why hassle of schemes announced by Social Welfare Department
Goa: Why hassle of schemes announced by Social Welfare DepartmentDainik Gomantak

सांगे : कोविड काळात ज्यांना आर्थिक फटका बसला त्यांना समाजकल्याण खात्यांतर्गत प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यातही खात्याने वर्गवारी करून कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतो याची सविस्तर माहिती खात्याने प्रसिद्ध केलेल्या अर्जात दिली आहे. योजना प्राप्त करण्यासाठी कोणकोणते कागदोपत्री पुरावे हवे, त्‍याची जंत्री दिलेली आहे. तरीही ही योजना मिळविण्यासाठी सांगेत जनतेची फरफट चालली आहे. उन्‍हात ताटकळत उभे राहून अधिकाऱ्यांची सही घेण्यात येत आहे. तरीही या योजनेची खरीच रक्कम मिळणार काय? असा प्रश्न लाभार्थी विचारू लागले आहेत.

Goa: Why hassle of schemes announced by Social Welfare Department
Goa Vaccination: कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सुर्ला गाव 100 % लसवंत

ज्यांचे कोविड काळात नुकसान झाले, त्यांना साहाय्य म्हणून पाच हजार रुपये देण्यासाठी समाज कल्याण खात्याने पुढाकार घेतला असला आहे. मात्र, त्याचा गैरफायदा अधिक प्रमाणात घेण्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी घरोघरी अर्ज वितरित केले जात आहेत. त्या योजनेत कोण बसतो की नाही, याचे भान न ठेवता अर्ज देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या माणसांनी दिलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार. अन्य कोणीही अर्ज दिल्यास त्यांना पाच हजार मिळणार नाही, अशी अफवा पसरवून मतांसाठी राजकारण केले जात आहे. त्‍यामुळे लाभ मिळविण्‍यासाठी अनेकांनी भरलेले अर्ज फाडून नव्याने दिलेले अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या जात आहेत. संभ्रमामुळे खरोखरच ज्‍याला लाभ हवा आहे, त्‍यांची फरफट होत आहे.

Goa: Why hassle of schemes announced by Social Welfare Department
Goa: ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्री सांवत याच्या हस्ते उद्घाटन

...तर अर्ज भरण्‍याची कटकट का?

या योजनेचा लाभ मिळविण्‍यासाठी ज्‍येष्ठ नागरीक पंचायत सचिव, मामलेदार यांच्या सहीसाठी कार्यालयात हेलपाटे मारू लागले आहेत. समाजकल्याण खात्याने दिलेल्या वर्गवारीत बसत नसल्यास मतांसाठी अर्ज वाटप केल्‍यास त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. मात्र, हा फटका पाच हजार मिळणार म्हणून जे लाभार्थी खटपट करतात, त्यांचे श्रम वाया जाणार असल्याची भीती लोक व्यक्त करू लागले आहेत. ही योजना जर सरसकट सर्वांनाच मिळत असेल, तर मग अर्ज भरण्याची कटकट का निर्माण करण्यात आली आहे. प्रत्येक घरात पाच हजार रुपये अर्ज वितरण करतात, त्याप्रमाणे ते दिले असते, तर अधिक बरे झाले असते. जर काहींचे अर्ज निवडणुकीपूर्वी फेटाळून लावले तर तुमचे अर्ज दुसऱ्या टप्प्यात होणार म्हणून सांगितले जाणार असल्याची भीतीही अर्जदार व्यक्त करू लागले आहेत.

कोविडला निमंत्रण!

अद्याप कोविड महामारीचा प्रसार थांबलेला नाही. तरीही मामलेदार कार्यालयात आणि बाहेर लाभार्थी गर्दी गर्दी करीत आहेत. रांगेत उभे राहून तासनतास वाट पाहत असल्‍याने कोविडला निमंत्रण ठरू शकते. एकूणच या योजनेची योग्य माहिती न देता राजकारण करण्यासाठी योजनेचा गैरफायदा घेऊन लोकांची फरफट चालविल्याचा आरोप सांगेवासीयांकडून केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com