Goa Vaccination: कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सुर्ला गाव 100 % लसवंत

गोवा राज्यातील ‘सुर्ला’ गाव लसीकरणात अव्वल
Surla village in Goa state leads in 100% vaccination
Surla village in Goa state leads in 100% vaccinationDainik Gomantak

वाळपई : सत्तरी तालुक्यातील चोर्ला घाटाच्या माथ्यावर असलेले कर्नाटक (Karnataka) राज्याच्या सीमेवरील (State Border) सुर्ला गावच्या (Surla) नागरिकांनी कोविड लसीकरणाच्या (Covid Vaccination) दुसऱ्या टप्यात शंभर टक्के प्रतिसाद दिल्याने राज्यात 100 टक्के लसीकरणात सुर्ला गाव अव्वल ठरला आहे. काल वाळपई सरकारी आरोग्य (Goavernment Health Department) विभागातर्फे कोविडचा दुसरा डोस देण्यात आला.

Surla village in Goa state leads in 100% vaccination
कोरोनाची तिसरी लाट घातक असणार नाही; डॉ. बांदेकर

वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. शाम काणकोणकर, डॉ. अभिजीत वाडकर, डॉ. वैभव गाडगीळ, व्यवस्थापक अकीब शेख, डोंगुर्ली ठाणे पंचायतीचे उपसरपंच सूर्यकांत गावकर उपस्थित होते. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन लोकांना कोविडचा दुसरा डोस दिला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Surla village in Goa state leads in 100% vaccination
Goa: राज्यात आज कोरोनामुळे एकही बळी नाही

गेल्या दोन वर्षांत काय झाले

कोरोना काळात लोकांचे राहणीमान बदलले. दैनंदिन व्यवहार बंद राहिले. खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या. बाहेर फिरणे कमी झाले. या सर्व गोष्टींमुळे अनेकांच्या शरीरावर बरे-वाईट परिणाम झाले. आता इस्पितळे पूर्ण स्वरूपात खुली झाल्याने लोक उपचारांसाठी गर्दी करत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात लोक गोमेकॉत येत असून दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातील बहुतांश लोकांचे आजार हे जीवनशैलीशी संबंधित असून काहींना डेंग्यू, स्ट्रोक, आदी असल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com