Goa Murder Case| सिद्धी नाईकच्या मृत्यूचा उलगडा पोलिस का लावू शकले नाहीत? नेटकऱ्यांचा सवाल

सिद्धी नाईक ही गोव्यातील युवती, पण तिचा खुनी अद्यापि मोकाट फिरत असावा, त्याला हात लावण्याचे धाडस पोलिस कधी करणार, असेही सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत.
Siddhi naik Case
Siddhi naik CaseDainik Gomantak
Published on
Updated on

सोनाली आणि सिद्धी

भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या कथित खुनानंतर राज्यातील सर्व यंत्रणा ढवळून निघाली. फोगटचा मृत्यू अमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे झाल्याचा संशय असल्याचे पुढे आले. फोगटच्या मृत्यूमुळे राज्यातील अमलीपदार्थ व्यवसाय मोडीत काढला जाईल, अशी वक्तव्ये सत्ताधारी नेत्यांकडून येऊ लागली. त्याशिवाय राष्ट्रीय प्रसार माध्यमांनीही फोगट मृत्यूप्रकरणाचा पाठलाग सुरू केल्याने पोलिसांची पळता भुई थोडी झाली आणि कर्लिस बिच शॅकमालक गजाआड झाला. त्याच्याबरोबर अवैध व्यवसायात गुंतलेले काही पंटरलोकही गजाआड झाले. त्याशिवाय त्या शॅकला टाळे ठोकले, शिवाय काही भागावर जेसीबीही चालला. फोगटच्या मृत्यूमुळे जर एवढे सगळे होत असेल, तर सिद्धी नाईक या युवतीच्याही संशयास्पद मृत्यूचा उलगडा पोलिस का लावू शकले नाहीत, असा सवाल आता समाज माध्यमांतून उपस्थित होत आहे. सिद्धी नाईक ही गोव्यातील युवती, पण तिचा खुनी अद्यापि मोकाट फिरत असावा, त्याला हात लावण्याचे धाडस पोलिस कधी करणार, असेही सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत. ∙∙∙

(Why goa police could not solve the death of Siddhi Naik)

Siddhi naik Case
Goa Agriculture| नैसर्गिक शेती उपक्रम लवकरच सुरू करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा डेअरीचे त्रांगडे

गोवा डेअरीचा शनिकाळ अजून संपलेला नाही. राज्यातील दूध उत्पादकांची एकमेव शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीची वाटचाल सध्या संजीवनीच्या दिशेने चालली असल्याची आवई खुद्द दूध उत्पादकच उठवत आहेत. आता हेच पाहा, गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्पही या ना त्या कारणाने चर्चेत आहे. या पशुखाद्य प्रकल्पातील टाकीच्या व्हॉल्वचा स्फोट होऊन आतील मोलेसिस वाहून वाया गेले. त्यामुळे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा विद्ममान अध्यक्षानी केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून माजी अध्यक्षानी चौकशी करून दाखवाच, असे आव्हान दिले आहे. हे आव्हान प्रतिआव्हान ठीक आहे हो, पण गोवा डेअरीची स्थिती सुधारण्यासाठी नेमके काय प्रयत्न चालले आहेत, त्यावर सर्व काही निर्भर आहे. गोवा डेअरीचे नेमके हेच त्रांगडे आहे. राज्य सरकारने तर विद्यमान संचालक मंडळाला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे, त्यामुळे त्याचा लाभ विद्यमान मंडळाने घ्यायला हवा, अन्यथा गोवा डेअरीची वाटचाल निश्‍चितच संजीवनीच्या दिशेने होईल, हे नक्की. ∙∙∙

राणेंचा दक्षिण दौरा

केंद्रीयमंत्री नारायण राणे अचानक गोव्यात का आले असावेत, असा प्रश्‍न कोणालाही पडेल. वास्तविक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपा पक्ष संघटनेने पूर्वीपासून केली आहे. त्यानुसार केंद्रातील मंत्र्यांना आपल्या विभागाबाहेर एक तरी नवीन मतदारसंघ सांभाळायचा, जोपासायचा आहे. त्या योजनेचा भाग म्हणून काही महिन्यांपूर्वीच नारायण राणे यांना दक्षिण गोवा मतदारसंघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. राणेंनी तेथे भेट देऊन आपला राजकीय अहवाल केंद्रीय पक्षाला द्यावयाचा आहे. वास्तविक राणे यांनी दक्षिण गोव्यात यायला उशीर केला, परंतु राणे ही नवी जबाबदारी कशी निभावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी शिवसेनेत असताना राणे यांच्याकडे गोव्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हा संजय राऊत म्हणाले होते, ‘आता राणे गोवा काबिज करणार’, अजूनही शिवसेना गोव्यात चाचपडतेच आहे. या पार्श्वभूमीवर भाजप दक्षिण गोवाही यावेळी जिंकून दाखवणार काय, हा खरा प्रश्‍न आहे. ∙∙∙

एवढे पैसे कोठून येतात?

कर्लिसवर शेवटी हातोडा पडला. वास्तविक ही सगळी अस्थायी पद्धतीची बांधकामे, परंतु त्यांनी सिमेंट काँक्रिटचे इमले उभारले. राज्य सरकारचे त्यांना अभय होते. स्थानिक आमदार मंत्री यांचा आशीर्वाद होता हे तर स्पष्ट दिसतेच आहे. वास्तविक केवळ ड्रग्स तेथे आले नाही तर त्याबरोबरीने गुन्हेगारी आणि माफियाही वास्तव्याला आला आहे. समुद्र किनाऱ्यावरील पोलिसांचे तर त्यांना संपूर्णतः अभय मिळत गेले. अजूनही गुन्हेगारी आणि बेकायदा कृत्यांना पोलिसांचे अभय नाही, असे कसे म्हणायचे? काल कळंगुट पोलिस ठाण्याच्या गणेशोत्सवानिमित्त ख्यातनाम गायक महेश काळे यांचे गायन झाले. गेला एक महिना पोलिसांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली. महेश काळे किती लाख घेतो हे सर्वांना माहीत आहे. त्याशिवाय या गणपतीच्या विसर्जनासाठी जोरदार वादन पथक बोलाविण्यात आले होते. त्यावरही लाखो रुपये खर्च झाले. हा पैसा कोठून येतो, असा सवाल सरकारला पडायला नको का? किमान ड्रग्स आणि गुन्हेगारी यांचा नायनाट करण्याची घोषणा करणाऱ्या नेत्यांना तरी तो प्रश्‍न पडायला हवा. ∙∙∙

कळंगुट पोलिसांचे प्रताप

कळंगुट पोलिस गोव्यातील एक श्रीमंत पोलिस ठाणे मानले जाते. तेथे नियुक्ती करून घेण्यासाठी लाखो रुपये नेत्यांना दिले जातात, हे तर उघड गुपित आहे. तेथे पोलिस कसे पैसे कमावतात, हेसुद्धा वेगळे सांगायची आवश्‍यकता नाही. सूत्रांच्या मते कळंगुटचा साधा पोलिस शिपाईसुद्धा विकेंडला ३० ते ४० हजार रुपये कमावतो. कळंगुटमध्ये सारीच बेकायदेशीरता ठासून भरलेली असल्याने लाथ मारीन तेथे पैसा निघतो. अगदीच हाताला काही लागले नाही, तर पोलिस शिपाई अल्कोमीटर घेऊन पर्यटकांच्या गाड्या तपासतात. विकेंडला गाड्या फिरविणारे सर्रास मध्यप्राशन केलेले असतात. बिअर तर त्यांच्या सहज हातात असते. त्यांना घाबरविले, धमकावले तर सहज हजार रुपये निघतात. ड्रग्स ही तर और बात आहे. त्यांच्याकडून किती लाख मिळू शकतात, हे सांगायची आवश्‍यकता नाही. त्यामुळेच कळंगुटमध्ये आलेला साधा शिपाई मोटारी घेऊन फिरतो. कळंगुट पोलिस ठाण्याच्या प्रत्येक शिपायाकडे चारचाकी वाहन आहे आणि हे सगळे सरकारला माहीत असूनही पोलिसांना सरसकट बढत्या मिळतात. ∙∙∙

Siddhi naik Case
Crocodile In Goa: सांताक्रूझच्या हद्दीतील शेत तळ्यात मगरीचा वावर

त्यामानाने कमी दारूकामाची आतषबाजी

दरवर्षी गणेशचतुर्थीला लाखो रुपये खर्चून दारूकामाची आतषबाजी केली जाते. दरवर्षी लाखो रुपये आगीत घातले जातात, पण त्यातून समाधान काहीच नाही. उलट फटाक्याचे प्रचंड प्रदूषण ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या अनारोग्याला कारणीभूत. लाखो रुपयांचा हा ‘फोग’ जाळण्यापेक्षा याउलट जर नावाला फटाके वाजवले तरी ठीक आहे हो. पण ऐकतो कोण..? तरीपण समाधानाची बाब म्हणजे यंदा राज्यात दारूकामावर मर्यादित पैसे खर्च करण्यात आले. घरगुती गणेशोत्सवाचे सोडा पण विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सवात तर मर्यादित फटाके वाजले. त्यामुळे हळूहळू फटाक्यांचे प्रदूषण आणि अनारोग्य याची जाणीव गणेश भक्तांना निश्‍चितच होईल हे नक्की. ∙∙∙

कळंगुट पोलिसांचे प्रताप

कळंगुट पोलिस गोव्यातील एक श्रीमंत पोलिस ठाणे मानले जाते. तेथे नियुक्ती करून घेण्यासाठी लाखो रुपये नेत्यांना दिले जातात, हे तर उघड गुपित आहे. तेथे पोलिस कसे पैसे कमावतात, हेसुद्धा वेगळे सांगायची आवश्‍यकता नाही. सूत्रांच्या मते कळंगुटचा साधा पोलिस शिपाईसुद्धा विकेंडला ३० ते ४० हजार रुपये कमावतो. कळंगुटमध्ये सारीच बेकायदेशीरता ठासून भरलेली असल्याने लाथ मारीन तेथे पैसा निघतो. अगदीच हाताला काही लागले नाही, तर पोलिस शिपाई अल्कोमीटर घेऊन पर्यटकांच्या गाड्या तपासतात. विकेंडला गाड्या फिरविणारे सर्रास मध्यप्राशन केलेले असतात. बिअर तर त्यांच्या सहज हातात असते. त्यांना घाबरविले, धमकावले तर सहज हजार रुपये निघतात. ड्रग्स ही तर और बात आहे. त्यांच्याकडून किती लाख मिळू शकतात, हे सांगायची आवश्‍यकता नाही. त्यामुळेच कळंगुटमध्ये आलेला साधा शिपाई मोटारी घेऊन फिरतो. कळंगुट पोलिस ठाण्याच्या प्रत्येक शिपायाकडे चारचाकी वाहन आहे आणि हे सगळे सरकारला माहीत असूनही पोलिसांना सरसकट बढत्या मिळतात. ∙∙∙

फोंड्यातील राजकीय कलगीतुरा

फोंडा मतदारसंघात सध्याचे आमदार रवी नाईक हे जरी भाजपचे आमदार असले तरी येणाऱ्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी सध्या पुढील निवडणूक लढविण्यासाठी व उमेदवारी मिळवण्यासाठी वावरत आहेत. दुसऱ्या बाजूने आमदारांचा मुलगा रितेश नाईक यांनी पुढील निवडणूक फोंड्यातून लढवावी व आमदार म्हणून विधानसभेत जावे ही स्वप्ने त्यांचे कार्यकर्ते पाहात आहेत. एका पक्षाच्या माजी खासदाराने तर दळवी यांना पुढील २०२७ चा आमदार म्हणून जाहीर करूनही टाकले आहे. वास्तविक २०२७ साल उजाडायला आणखी पाच वर्षे आहेत. या पाच वर्षात फोंड्यात काय बदल होतील आणि कोण कुठे असेल हे सांगता येणे कठीण. २०१७ साली कुणाला पात्रांव पुढच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असतील असे स्वप्नात तरी वाटले होते का? ∙∙∙

कर्लिस व सिली सोल्स

गोव्यात सध्या ही दोन्ही हॉटेले तथा शॅक भयंकर चर्चेत आहेत. अर्थात ही चर्चा चांगल्या कारणाने सुरू नाही ही गोष्ट वेगळी. सोनाली फोगट व केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांची नावे या दोन्ही आस्थापनाशी जोडली जात असल्याने गोव्यात ती जास्त वादग्रस्त ठरली आहेत, पण त्यातही मजेशीर बाब म्हणजे सिली सोल्स प्रकरणात सक्रिय असलेले अनेकजण कर्लिस प्रकरणात गप्प आहेत. त्या मागील कारण काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com