गोवा सरकार नाईट कर्फ्यू कधी लावणार?

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात कडक निर्बंध लागू
Goa Omicron Variant Night Curfew restriction

Goa Omicron Variant Night Curfew restriction

Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : ओमिक्रॉनचा धसका घेतलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने प्रतिबंधात्मक पावलं उचलली आहेत, चाचण्यांमध्ये वाढ करत असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. मात्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे गोवा सरकार निर्बंध लागू करण्यासाठी कुणाची वाट पाहतंय असा सवालही विचारला जात आहे.

Goa Omicron Variant Night Curfew restriction

गोव्यात धोक्याची घंटा; 8 वर्षाचा मुलगा ओमिक्रॉन बाधित!

गोव्यात (Goa) सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनला (Lockdown) कंटाळलेल्या देशी-परदेशी पर्यटकांची पावलं आता गोव्याकडे वळू लागली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील सर्वच किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. राज्यातील सर्वच ह़ॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र गोव्यात दाखल होणारे पर्यटक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र आहे.

पर्यटकांची वाढती संख्या आणि गेल्या काही दिवसात राज्यात वाढलेलं कोरोना रुग्णांचं प्रमाण या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. जे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला जमू शकतं, ते नाईट कर्फ्यू लावणं गोवा सरकारला का जमत नाही असा प्रश्नही विचारला जात आहे. गोवा सरकारने तातडीने उपाययोजना करुन निर्बंध लागण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Goa Omicron Variant Night Curfew restriction

नागरिकांचे 'लसीकरण' झाल्याने गोवा सरकार बिनधास्त?

महाराष्ट्रात नाईट कर्फ्यूची अमलबजावणी

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रात्रीच्या कर्फ्यू ( Night Curfew) दरम्यान 5 पेक्षा जास्त लोक जमू शकणार नाहीत. लग्नसमारंभात 100 लोकांना परवानगी असेल.

एकूण क्षमतेच्या 25 टक्के किंवा 250 लोक मोकळ्या जागेत जमू शकतील. हेच राजकीय, (Political) धार्मिक कार्यक्रमांनाही लागू होईल. क्रीडा (Sports) स्पर्धांदरम्यान, क्षमतेच्या केवळ 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, जिम, स्पा, सिनेमा हॉल एकूण क्षमतेच्या 50 टक्के सुरू राहणार.

Goa Omicron Variant Night Curfew restriction

चिंता वाढली! पाच दिवसांत गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

कर्नाटकमध्येही निर्बंध

ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्यामुळे कर्नाटक (Karnataka) सरकारने रविवारी राज्यात नवीन निर्बंध लादले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार, सर्वत्र नाईट कर्फ्यू लावला जाईल, त्याचबरोबर मोठ्या मेळाव्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या राज्यातील ओमिक्रॉन बंधितांची संख्या 38 वर पोहोचली आहे.

Goa Omicron Variant Night Curfew restriction

ओमिक्रॉनमुळे गोव्यातील शाळा पुन्हा बंद होणार?

10 राज्यांमध्ये केंद्रीय पथक

कोरोना आणि ओमिक्रॉनचा (Omicron) वाढता धोका लक्षात घेता केंद्रीय पथक महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. ही पथके तीन ते पाच दिवस राज्यात तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकार्‍यांशी जवळून काम करतील. अशा प्रकारे, ते राज्यांना परिस्थितीचे आकलन करण्यात आणि त्यांना सामोरे जाण्यास मदत करतील. उपाय सांगतील आणि दररोज संध्याकाळी सात वाजता संबंधित राज्यातील व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारला कळवतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com