Viral Post: गोव्यातील पब भारतीयांशी भेदभाव का करतात? केरळच्या पर्यटकाची Reddit वर पोस्ट, चर्चांना फुटले पेव

Reddit Viral Post: मी पुन्हा कधीच गोव्यात येणार नाही आणि दुसऱ्या कोणाला जाण्याचा सल्लाही देणार नाही.
Viral Post: गोव्यातील पब भारतीयांशी भेदभाव का करतात? केरळच्या पर्यटकाची Reddit वर पोस्ट, चर्चांना फुटले पेव
Reddit Viral PostDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'गोव्यातील पब भारतीयांशी भेदभाव करतात. दुसरीकडे विदेशी नागरिकांना मात्र रांग तोडून देखील प्राधान्याने पबमध्ये प्रवेश दिला जातो', असा अनुभव एका केरळच्या पर्यटकाने शेअर केला आहे. रेडीट या समाजमाध्यावर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांमध्ये चर्चांचा विषय ठरली आहे.

या पर्यटकाने तो केरळचा रहिवासी असल्याचा दावा पोस्टमधून केला आहे. तसेच, पुन्हा तो गोव्यात कधीच येणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. रेडीट हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असून, येथे खाते उघडून आपली ओळख गुप्त ठेऊन विविध विषयांवर मतं मांडता येतात. गोवा या सबरेडीडवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे.

काय आहे पोस्ट?

"गेल्यावर्षी मी गोव्यात आलो होता. येथील पब भारतीयांशी भेदभाव करत असल्याचे दिसून आले. परदेशी नागरिकांना मात्र रांग तोडून प्रवेश दिला जात होता. ते नेहमीच परदेशी नागरिकांना प्राधान्य देतात. कोरियन मुलाला देखील रांग तोडून पबमध्ये प्रवेश दिला. दुसरीकडे कोरियात काही पबमध्ये भारतीयांना प्रवेश देखील दिला जात नाही."

Viral Post: गोव्यातील पब भारतीयांशी भेदभाव का करतात? केरळच्या पर्यटकाची Reddit वर पोस्ट, चर्चांना फुटले पेव
Marathi-Konkani Issue Goa: 'मराठीला डावलणे ही आंदोलनासाठीची चिथावणी', सुभाष वेलिंगकर यांचा गंभीर इशारा!

"मी परदेशात वाढलो, सध्या अमेरिकेत राहत आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत. मी चांगला सुंगधित सेंट वापरतो, मी स्वच्छ दिसतो, कपडेही ब्रँडेड घालतो. पण, मला माझ्याच देशात भेदभाव का सहन करावा लागतो? मी केरळचा रहिवासी आहे. केरळमध्ये पण खूप मोठे पब आहेत. पण, तिकडे कधीच असा भेदभाव पाहिला नाही आणि कधी होणार देखील नाही. मी पुन्हा कधीच गोव्यात येणार नाही आणि दुसऱ्या कोणाला जाण्याचा सल्लाही देणार नाही."

Viral Post: गोव्यातील पब भारतीयांशी भेदभाव का करतात? केरळच्या पर्यटकाची Reddit वर पोस्ट, चर्चांना फुटले पेव
MGP Goa: 'खंय खाजता आनी खंय खाजयंता'? उदय भेंब्रे पोर्तुगिजांची पिलावळ; 'मगो' नेत्यांची प्रखर टीका

रेडीटवरील या पोस्टवर एक हजारहून अधिक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकाने, 'हे फार दुर्दैवी आहे. पण गोव्यात असे प्रकार होत असतात. पब प्रामुख्याने परदेशी नागरिकांना टार्गेट करतात कारण परदेशी पर्यटक खर्च खूप करतात', असे मत व्यक्त केले आहे.

दुसऱ्या एका व्यक्तीने, 'छपरी पर्यटक बेशिस्तपणे वागतात आणि परदेशी महिलांसोबत त्यांच्या परवानगी शिवाय फोटो काढतात. मद्यधुंद अवस्थेत छेडछाड करतात. अशा घटना थायलंड आणि व्हिएतनाम अशा देशात देखील समोर आल्यात', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

'मी गोव्यात अनेकवेळा गेलो आहे. यावर्षी दोनवेळा गेलो. समस्या ही आहे की आपण गोव्याकडून खूप अपेक्षा करतो. गोव्यात जा, खा, प्या आणि आनंद घ्या. मला गोव्यात कधीच असा अनुभव नाही आला', असे मत आणखी एकाने मांडले आहे.

तर, उत्तर भारतातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे मत दुसऱ्या एका नेटकऱ्याने मांडले आहे.

Viral Post: गोव्यातील पब भारतीयांशी भेदभाव का करतात? केरळच्या पर्यटकाची Reddit वर पोस्ट, चर्चांना फुटले पेव
Goa Tourism: विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारच्या हालचाली सुरु, केंद्राकडे करणार मोठी मागणी

'प्रामाणिकपणे सांगायचं तर अनेक भारतीय पर्यटक गोव्यात फक्त दारू प्यायला आणि पार्टी करण्याच्या मानसिकतेने जातात. यानंतर मद्यधुंद अवस्थेत हाणामारी करतात याशिवाय दुसऱ्याही घटना घडतात. मी बस किंवा ट्रेनने प्रवास करतो त्यावेळी अनेकजण गोव्यात आम्ही फक्त पार्टी आणि दारु पिण्यासाठी जातो, असे बोलताना ऐकलंय. अशी मानसिकताच समस्या आहे', मत एका रेडीट युझरने मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com