भारत राष्ट्र समितीचे (BRS) आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडून आलेले नेते गेल्या आठवडाभरापासून गोव्यात तळ ठोकून आहेत. पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी आज (सोमवारी, 25 मार्च) गोव्यात आमदार आणि नेत्यांची भेट घेतली.
राज्यात सुरु असलेल्या पक्षांतराच्या लाटेत आमदार आणि नेते सत्ताधारी काँग्रेसच्या आमिषाला बळी पडू नयेत यासाठी BRS चे आमदार आणि नेते गोव्यात तळ ठोकून आहेत.
महबूबनगर विधान परिषदेची पोटनिवडणूक येत्या 28 मार्च रोजी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार आणि नेते फुटू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
28 मार्च रोजी निवडणूक होणाऱ्या या निवडणुकीची मतमोजणी 2 एप्रिल रोजी होणार आहे. तर, 13 मे रोजी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होतआहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषदेच्या (MLC) निवडणुकीत आमदार, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड, जिल्हा प्रजा परिषद आणि मंडल प्रजा परिषदांचे सदस्य मतदान करण्यास पात्र असतात.
विधान परिषदेचे आमदार कासी नारायण रेड्डी यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बीआरएसचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये सामील होते. त्यानंतर महबूबनगरसाठीचे पद रिक्त झाले. पोटनिवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर कालवकुर्ती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी बीआरएसने एन. नवीन कुमार रेड्डी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने मन्नी जीवन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.
विधानसभेत काँग्रेसचे बहुमत असले तरी विधान परिषदेत त्यांचे केवळ चार सदस्य आहेत. वरच्या सभागृहात 40 पैकी 24 सदस्यांसह बीआरएसचे वर्चस्व आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.