Tamnar Project: गोव्याच्या मार्गात कर्नाटकचा पुन्हा अडथळा; तमनारच्या विद्युत वाहिनीला सरकारचा नकार

Tamnar Project: दक्षिण गोव्यातील वीज समस्या सोडविण्यासाठी गोवा सरकारचा तमनार प्रकल्प प्रस्तावित आहे.
Tamnar Project
Tamnar Project Dainik Gomantak

Tamnar Project

म्हादईच्या पाणीप्रश्नावरुन कर्नाटक आणि गोव्यात वाद सुरु असताना आता आणखी एका मुद्यावरुन वादाची ठिणगी पडली आहे. दक्षिण गोव्यातील वीज समस्या सोडविण्यासाठी गोवा सरकारचा तमनार प्रकल्प प्रस्तावित आहे.

दरम्यान, या प्रकल्पाची विद्युत वाहिनी पश्चिम घटातून घेऊन जाण्यास कर्नाटक सरकारने नकार दिला आहे. त्याऐवजी विद्युत वाहिनी वन विरहीत क्षेत्रातून घेऊन जावी असा सल्ला देखील दिला आहे.

पश्चिम घटात होणाऱ्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून या प्रकल्पाची शिफारस करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत.

छत्तीसगडमधील तमनार येथून वीज आणून दक्षिण गोव्यातील काही भागात वीज पुरवठा करण्याची गोवा सरकारची योजना आहे. यासाठी काली व्याघ्र प्रकल्पासह (KTR) तब्बल 174.6 हेक्टर वनजमीनीतून 400 kV ट्रान्समिशन लाइन टाकण्यासाठी GTTPL ने कर्नाटककडे परवानगी मागितली होती.

दरम्यान, एजन्सीला नॅशनल बोर्ड फॉर वाइल्डलाइफ (NBWL) कडून अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे. पण, GTTPL ने कर्नाटकच्या जंगलांमधून ट्रान्समिशन लाइन टाकण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली.

Tamnar Project
Goa Viral Post: बाबाजी का ठुल्लू! दक्षिण गोवा उमेदवारीवरुन आप, काँग्रेसची टीका; भाजपचाही पलटवार

दक्षिण गोव्यात दाखल होण्यापूर्वी ट्रान्समिशन लाइन कर्नाटकच्या बेळगाव, धारवाड आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातून जाणार आहे.

GTTPL ने बेळगावी, धारवाड आणि उत्तर कन्नड या नऊ गावांमध्ये 360 हेक्टर निकृष्ट वनजमिनीवर वनीकरण करण्याचा प्रस्ताव देखील सादर केला आहे.

ट्रान्समिशन लाइन टाकण्यासाठी दांडेली वन विभागासह सहा वन क्षेत्रातील ७२ हजार झाडे हटवली जाऊ शकतात. आश्चर्याची बाब म्हणजे धारवाड, हलियाल आणि दांडेली येथील उप वनसंरक्षकांनी प्रस्तावाची शिफारस केली, तर बेळगाव प्रस्ताव फेटाळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com