रवींचा वारसा पुढे कोण चालवणार? रॉय का रितेश कोणाला मिळणार उमेदवारी? फोंड्यात लवकरच होणार पोटनिवडणूक

Ponda Goa By-elections 2025: रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा विधानसभा मतदारसंघाची जागा आणि रवींकडे असलेल्या कृषी आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्रीपद देखील रिक्त झाले आहे.
Roy or Ritesh to Get Fonda Bypoll Ticket?
Ravi Naik’s LegacyDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Goa By-elections 2025

फोंडा: चार दशकाहून अधिक काळ गोव्याच्या राजकारणात महत्वाचे नेते म्हणून वावरणाऱ्या मंत्री रवी नाईक यांचे मंगळवारी निधन झाले. मुख्यमंत्री, खासदार ते राज्यातील महत्वाची मंत्रिपदं असा थक्क करणारा प्रवास रवी नाईक यांनी पूर्ण केला होता. सध्याही ते राज्याचे कृषिमंत्री म्हणून काम पाहत होते. रवींच्या निधनाने फोंडा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघासाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे.

रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा विधानसभा मतदारसंघाची जागा आणि रवींकडे असलेल्या कृषी आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्रीपद देखील रिक्त झाले आहे. फोंड्यातील रिक्त जागेसाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे.

फोंड्याची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना बुधवारी (१५ ऑक्टोबर) विधानसभा सचिवालयाने जारी केली आहे. निवडणूक आयोगाला देखील याबाबत कळविण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत याठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून, भाजप कोणाला उमेदवारी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Roy or Ritesh to Get Fonda Bypoll Ticket?
Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

रितेश आणि रॉय असे रवी नाईक यांचे दोन पुत्र आहेत. दोघेही सध्या फोंडा पालिकेचे नगरसेवक आहेत. आता रवींचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी भाजप कोणावर देते हे पाहणं औत्युक्याचे ठरणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष रॉय का रितेश? यापैकी कोणाला उमेदवारी देणार याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील वरिष्ठ नेतृत्वाचा याबाबत निर्णय अंतिम झाल्यानंतर तो केंद्राला कळवून उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते.

Roy or Ritesh to Get Fonda Bypoll Ticket?
Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

दुसरीकडे रवींच्या निधनाने त्यांच्याकडे असलेल्या कृषी आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्रिपद देखील रिक्त झाले आहे. त्यामुळे या मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार? याबाबत देखील सध्या खल केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला. यात दिगंबर कामत आणि रमेश तवडकरांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे रवींच्या जागी कोणाला संधी दिली जाते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, रवी नाईक यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय त्यांनी गृह, वित्त, कृषी, बांधकाम, महिला व बालविकास अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. रवींनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com