Margao Accident: मडगावातील 'त्या' वीजधक्का मृत्यू प्रकरणाला जबाबदार कोण?

या प्रकरणात सर्वाधिक दोष नगरपालिका व त्यापाठोपाठ वीजखात्यावर येऊ लागला आहे.
Margao Accident
Margao AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Accident मडगावात भर बाजार परिसरात वीजधक्क्याने एका बिहारी कामगाराचा मृत्यू झाला खरा; पण त्या मृत्यूची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न संबंधित सरकारी यंत्रणांकडून चालू आहे व त्यामुळे सामान्य लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाशी मडगाव नगरपालिका, वीज खाते व पोलिस तपास यंत्रणा यांचा संबंध येतो; पण या प्रकाराला नेमका कोण जबाबदार, याबाबत कोणताच निष्कर्ष काढला गेला नाही तर प्रत्येकजण दुसऱ्यावर जबाबदारी झटकताना व आपला बचाव करताना दिसून येतो.

Margao Accident
Pravin Arlekar : पेडण्यातील विकासकामांबाबत आमदार आर्लेकरांची महत्वाची माहिती; म्हणाले ही कामे...

त्यामुळे या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी या मृत्यूस जबाबदार कोण ते शोधण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही, असा निष्कर्ष निघत आहे.

या प्रकरणात सर्वाधिक दोष नगरपालिका व त्यापाठोपाठ वीजखात्यावर येऊ लागला आहे. कारण ज्या पॅनलजवळ ही घटना घडली, त्या पॅनलजवळ असे आणखी वीजजोडण्या असलेले जाहिरात फलक असून कोणीच त्यांची दखल घेतलेली नाही व त्यामुळे त्या परसरात ये-जा करणाऱ्यांसाठी ते धोक्याचे ठरलेले आहेत.

Margao Accident
काळ आला होता, पण... सावईवेरे- माशेल मार्गावर घडली काळजात धडकी भरवणारी घटना

पालिका, वीज खात्याचे दुर्लक्ष

अशा फलकांसाठी पालिकेची व त्यावर वीजजोडणी घालावयाची असेल तर कायद्याने वीज खात्याची परवानगी आवश्यक आहे.

पण संबंधित यंत्रणेला त्याची कल्पना नाही की या घटनेला इतके दिवस उलटून गेल्यावरही असे फलक हटविण्यासाठी वा वीजजोडण्या तोडण्यासाठी कोणतीच पावले उचललेली नसल्याने मानवी मृत्यूचे कोणालाच पडून गेलेले नाही हेच स्पष्ट होते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com