Pravin Arlekar : पेडण्यातील विकासकामांबाबत आमदार आर्लेकरांची महत्वाची माहिती; म्हणाले ही कामे...

भूतवाडी-विर्नोडा येथे पदपथ बांधकामास प्रारंभ
Pravin Arlekar
Pravin ArlekarGomantak Digital Team

पेडणे मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रांतील विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येतील ,अशी ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विर्नोडा पंचायत क्षेत्रातील भूतवाडी येथे दिली. बारा लाख रुपये खर्च करून पदपथ बांधकामाचे श्रीफळ वाढवून व भूमी पूजन करून उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी विर्नोडा सरपंच सुजाता ठाकूर, उपसरपंच दामोदर नाईक, पंचायत सदस्य अक्षता सावंत, प्रदीप परब, स्वाती मालपेकर, मयूर परब, सागर परब, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते श्रीनिवास गावस,माजी सरपंच देवेंद्र परब ,प्रदीप परब ,विनायक राव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Pravin Arlekar
CM Pramod Sawant : संसद भवनला काँग्रेसकडून होणारा विरोध निरर्थकच

प्रत्येक पंचायत क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे ३० मे पूर्वी पूर्ण होणार आहेत. यासाठी प्रत्येक पंचायत मंडळांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन करून पेडणेतील विकासाला पद्धतीने दिशा देण्याचे काम सुरू आहे. विकास कामांवर पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे,असे आमदार आर्लेकर म्हणाले. सरपंच सुजाता ठाकूर यांचेही याप्रसंगी समयोचित भाषण झाले.

Pravin Arlekar
Panaji Session Court: भंडारी समाज जमीन हस्तांतर घोळ; चोवीस तासांत तक्रार दाखल करा!

पावसाळ्यात समस्या नकोत !

पेडणे मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांना गती देण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कामाला प्राधान्य देताना पावसाळ्यात समस्या उद्भवणार नाहीत, याकडेही लक्ष देण्याची सूचना केली आहे. गटार व्यवस्था कोलमडू नये, त्यासाठी पंचायत आणि रस्ता विभागाने लक्ष देऊन ती कामे त्वरित करावीत,अशी सूचना आमदार आर्लेकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com