Goa Politics: मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून केलेली पापं धुण्याचा प्रयत्न करतायेत का? गोवा CM, मंत्र्यांच्या कुंभमेळा दौऱ्यावर काँग्रेसचा सवाल

Goa Congress Vs BJP Politics: या ट्रीपसाठी खर्च कोण करत आहे?, असा सवाल चोडणकरांनी त्यांच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.
Girish Chodankar On BJP Kumbhmela
Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यासह राज्याचे मंत्री आणि आमदारांनी नुकतेच प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात सहभागी होत पवित्र स्नान केले. यावरुन काँग्रेस नेते गिरिश चोडणकरांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "करदाते नागरिक प्रयागराजसाठी ट्रेन प्रवासाचे धक्के खात असताना सत्ताधारी लक्झरी चार्टरमधून प्रवास करतायेत. यासाठी कोण पैसे देतंय", असा सवाल चोडणकरांनी उपस्थित केला आहे.

"लोकशाहीची ही काय विडंबना आहे! कष्टकरी करदाते महाकुंभला जाण्यासाठी ट्रेनमधून धक्के खात आहेत. दुसरीकडे सत्तेत असणारे लोक, त्यामध्ये मुख्यमंत्री, भाजपचे मंत्री आणि आमदार त्यांच्या कुटुंबासह चार्टर विमानातून प्रवास करतायेत. आणखी वाईट गोष्ट म्हणजे यात लोकांचा विश्वास घात करुन पक्षांतर केलेल्या आणि महालक्ष्मीला देखील धोका दिलेल्या आमदारांचा देखील यात समावेश आहे."

या ट्रीपसाठी खर्च कोण करत आहे?, असा सवाल चोडणकरांनी त्यांच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.

Girish Chodankar On BJP Kumbhmela
Margao Crime: रेस्टाॅरंट कामगार झाला हैवान; जेवण करण्यासाठी आलेल्या मायलेकीवर लैंगिक अत्याचार

"हे तेच करदाते लोक आहेत का ज्यांनी गर्दीने फुल्ल ट्रेन आणि थकवणारा प्रवास करण्यास नकार दिला? गोव्याचे लोक याबाबत पारदर्शकतेची मागणी करतायेत. आम्ही कष्टाने कमावलेले पैसे कशा पद्धतीने खर्च केले जातायेत हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे", असे चोडणकरांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Girish Chodankar On BJP Kumbhmela
Dudhsagar: आंघोळीसाठी नदीत उतरला अन् अचानक गायब झाला; उत्तराखंडचा तरुण दूधसागरमध्ये बुडाला

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह त्यांचे मंत्री मंडळातील सहकारी, राज्यपाल आणि आमदारांनी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्वांचे कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत होते. गोव्यातून विमानाने सर्वजण प्रयागराज येथे दाखल झाले. या प्रवासावरुन काँग्रेसने आता भाजपवर सवाल उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com