सुर्ल येथील ‘सिंहाचो बांध’ बंधाऱ्यात युवक बुडाला

आंघोळ करताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला
Death
DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

बंधाऱ्यातील पाण्यात बुडाल्याने 42 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घाडीवाडा-सुर्ल येथील ‘सिंहाचो बांध’ या बंधाऱ्यात घडली. प्रताप वसंत आमोणकर असे मृताचे नाव आहे. तो भिलेवाडा-सुर्ल येथील होता.

Death
Goa Crime: दक्षिण गोव्यातील गुन्हेगारी घटनांबाबत पोलीस अधिक्षकांची महत्वाची माहिती, म्हणाले..

मंगळवारी सायंकाळी प्रताप अन्य तीन मित्रांसमवेत बंधाऱ्यावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. आंघोळ करताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढून उपचारार्थ इस्पितळात नेले.

Death
Monsoon Arrives in Kerala 2023: बहुप्रतिक्षेत असलेला मॉन्सून केरळच्या टप्प्यात

मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात शवचिकित्सा केल्यानंतर आज प्रताप याचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. प्रताप याच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kapileshwari Kavale Pond Fish Death
Mahikavati Bakhar History
Satorli Gavdongari Accident
Toddler dies in house wall collapse
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com