Monsoon Arrives in Kerala 2023: बहुप्रतिक्षेत असलेला मॉन्सून केरळच्या टप्प्यात

हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Weather Updates
Weather UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Arrives in Kerala 2023: अल निनोचा प्रभाव, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आणि मॉन्सूनसाठी पोषक असलेल्या स्थितीचा अभाव, यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षेत असलेला मॉन्सून अखेर केरळच्या टप्प्यात आल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पुढील 48 तासांत मॉन्सूनच्या सरी केरळात दाखल होतील. तर दुसरीकडे अरबी समुद्रातील चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असून गुरुवारपासून त्याचा परिणाम पश्‍चिम किनारपट्टीवर होईल, अशी शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत केरळमध्ये मॉन्सून सक्रिय होण्यासाठीची परिस्थिती अनुकूल होत आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिणेच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत आहे.

यात अरबी समुद्र, संपूर्ण लक्षद्वीप, मालदीव, कोमोरिन क्षेत्र यांचा समावेश आहे. याच दरम्यान बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भागात मॉन्सून आपली हजेरी लावेल, अशी स्थिती आहे.

Weather Updates
Fishing in Goa: बास्केट मासेमारी विरुद्ध 'गोएचो रापोणकारांचो एकवोट'चा एल्गार, सरकारकडे केलीय 'ही' मागणी

....तर केरळमध्ये मॉन्सून सक्रिय
1 ) दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग कायम हवा.
2) मध्य ट्रोपोस्फेरिक पातळीपर्यंत पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली वाढणे.
3) आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनारपट्टीवर ढगाळपणा वाढायला हवा

Weather Updates
Goa Crime: दक्षिण गोव्यातील गुन्हेगारी घटनांबाबत पोलीस अधिक्षकांची महत्वाची माहिती, म्हणाले..

‘बिपरजॉय’ उत्तर-ईशान्य दिशेने:-

पूर्वमध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावरील निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 5 किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे. हे वादळ गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 880 किलोमीटरवर, मुंबईच्या नैऋत्येस 990 किमी आहे.

तर पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस 1060 किमी आणि कराचीच्या दक्षिणेस 1360 किमीवर आहे. पुढील 12 तासांत हे तीव्र चक्रीवादळ आपली दिशा बदलण्याची दाट शक्यता आहे. पुढील 24 तासांत ते उत्तरेकडे आणि नंतर उत्तर-वायव्येकडे सरकेल, असा हवामान खात्याचा अनुमान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com