Goa: निवडणुकीतील उमेदवार आता गेले कोठे ?

पीडित शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाकडे मात्र हे बहुतांश उमेदवार फिरकलेच नाहीत.
Goa Election 2022
Goa Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सर्वच उमेदवारांनी मोपा विमानतळावर उपलब्ध होणारा रोजगार पेडणेकरांनाच मिळवून देण्‍याची ग्वाही दिली होती. परंतु पीडित शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाकडे मात्र हे बहुतांश उमेदवार फिरकलेच नाहीत. पेडणेतून भाजपचे प्रवीण आर्लेकर, मगोचे राजन कोरगावकर, काँग्रेसचे ॲड. जितेंद्र गावकर, ‘आरजी’चे सूजय म्हापसेकर, अपक्ष विष्णुदास कोरगावकर, ‘आप’चे पुंडलिक धारगळकर, शिवसेनेचे सुभाष केरकर हे उमेदवार रिंगणात होते.

Goa Election 2022
गोव्यातील खाणचालक उतरले मैदानात

प्रत्येकांनी आपण पेडणेकरांसोबतच राहू, असे जाहीर केले होते. तालुक्यात येणाऱ्या प्रकल्पांतून उपलब्ध होणारा रोजगार स्थानिकांनाच मिळवून देणार अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली होती. मात्र मोपा लिंक रोडविरोधातील आंदोलनाकडे त्‍यांनी हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष केले आहे. फक्त अपवाद ठरले ते काँग्रेसचे उमेदवार ॲड. जितेंद्र गावकर, आम आदमी पक्षाचे ॲड. प्रसाद शहापूरकर आणि अपक्ष उमेदवार पुंडलिक धारगळकर. हे तिघेच जण आंदोलकांसोबत होते. इतर उमेदवार फिरकलेसुद्धा नाहीत. केवळ मतांसाठी ते आमच्या दारावर वारंवार येत होते, असे म्हणत आंदोलकांनीही नाराजी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com