INDI Alliance LS Goa Candidate: गोव्यातील 'इंडिया' आघाडीचे लोकसभा उमेदवार कधी ठरणार? युरी आलेमाव यांनी दिली माहिती

INDIA Alliance Loksabha Goa Candidate: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
INDI Alliance LS Goa Candidate| Yuri Alemao
INDI Alliance LS Goa Candidate| Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

INDIA Alliance Loksabha Goa Candidate

लोकसभेच्या दोनच जागा असल्या तरी गोव्यात उमेदवार ठरवणे भाजप आणि 'इंडिया' आघाडीसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. भाजपने उत्तर गोव्यात विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. मात्र, दक्षिणेतील पेच कायम आहे. भाजप दक्षिणेत महिला उमेदवाराचा देखील विचार करत असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे इंडिया आघाडीने अद्याप एकही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

इंडिया आघाडीतील काँग्रेस गोव्यातील दोन्ही लढवणार आहे. आपने दक्षिणेत उमेदवाराची घोषणा केल्यानंतर दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, गोव्यात यासाठी कॉंग्रेसला पाच राजकीय पक्षांची साथ लाभली आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष हे पक्ष कॉंग्रेससोबत निवडणूक प्रचारातही सक्रिय असतील. यांच्यातील राजकीय समन्वयासाठी समिती नेमली जाणार आहे. बुधवारी या सर्व पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

दरम्यान, विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी इंडिया आघाडीचा उमेदवारक केव्हा जाहीर केला जाणार याबाबत माहिती दिली आहे.

INDI Alliance LS Goa Candidate| Yuri Alemao
Actress Soumya Shetty Arrest: अभिनेत्री सौम्या शेट्टीला अटक; 150 तोळे सोने चोरुन गाठला गोवा

इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार येत्या चार ते पाच दिवसात जाहीर केले जातील अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली आहे. काँग्रेस राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

तसेच, भाजपच्या नेत्यांना पराभव दिसू लागल्याने ते दक्षिणेचा उमेदवार ठरविण्यासाठी वेळकाढूपणा करत आहेत, असेही आलेमाव म्हणाले.

आघाडीच्या झालेल्या या बैठकीपासून रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) आणि तृणमूल कॉंग्रेस हे पक्ष मात्र दूरच राहिले. रिव्हॉल्युशनरी गोवन्स भाजपची बी टीम असल्याचा आरोप यावेळी प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com