Goa Gas: फोंड्यातील गॅस वाहिनी नक्की कधी सुरु होणार

Ponda: तीन वर्षे झाली तरी काम 'अधांतरीच'
Goa Natural Gas Pvt. Ltd.
Goa Natural Gas Pvt. Ltd.Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Natural Gas Private Limited: गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने ग्राहकांना गॅस कनेक्शन देतो म्हणून सांगून फोंडावासीयांकडून काही आगाऊ रक्कम घेतली मात्र तीन वर्षांहून अधिक काळ उलटला तरी हा गॅस पुरवठा सुरू झालेला नाही. काही घरात जोडण्या केल्या असून काही ठिकाणी तर मीटर्सही बसवले आहेत. याकरिता अनेकांकडून 2000 ते साडेचार हजार एवढे पैसे अनामत रक्कम म्हणून घेतली आहे. आता तर पावत्यांवर दिलेले फोन नंबरर्सही फोनही चालत नसल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान, गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मंगेश नावाच्या एका अभियंत्याचा दिलेला मोबाईल क्रमांक सुध्दा ‘नॉटरिचेबल’ आहे. त्यामुळे आपले पैसे बुडीत खात्यात तर जमा झाले नाहीत ना, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. गॅसवाहिनीकरिता शहरात अनेक ठिकाणी खड्डे केले होते व त्यातून या वाहिन्याकरिता पाईपलाईन टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनाही ही सेवा लगेच उपलब्ध होईल, असे वाटत होते. पण सध्या ग्राहकांच्या पदरी निराशा पडल्याचे दिसून येत आहे. हे पाहता आता या प्रकरणात सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी लोक करीत आहेत.

Goa Natural Gas Pvt. Ltd.
Sadanand Shet Tanavade : ...तर काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपमध्ये घेतलंच नसतं

रिया पारकर, शिक्षिका फोंडा-

ही गॅस लाईन सिलिंडरपेक्षा स्वस्त असल्यामुळे तसेच ती वीज-पाण्यासारखी लाईनमधून घरापर्यंत येत असल्यामुळे आम्हा गृहिणींना आकर्षण वाटत होते. यामुळेच आम्ही त्याकरिता दोन हजार रूपये भरले. आमच्यासारख्या नोकरदार गृहिणींना सिलिंडरची वाट बघण्यापेक्षा असा दारात येणारा गॅसचा पुरवठा हवाच होता. पण सध्यातरी आमच्या आशांवर पाणी पडले असून आता हे दोन हजार रूपये अक्कलखाती जमा करावे की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Goa Natural Gas Pvt. Ltd.
Goa Politics: आठ आमदार फुटल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी प्रभारी दिनेश गुंडूराव गोव्यात दाखल

सिलिंडेर्सचा पर्याय म्हणून या गॅस लाईनची जाहिरात करण्यात येत होती. हा पुरवठा सुरू झाल्यास सिलिंडर्सकरिता बुकींग करणे तसेच सिलिंडराची वाट बघत बसणे या झंझटातून मुक्तता होईल असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे आम्ही बिनदिक्कत त्यांनी सांगितलेली आगाऊ रक्कम भरली होती. सगळा खर्च 5000 रूपये येईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. आणि ते आम्हाला मान्य ही होते. पण आता तीन वर्षे झाली तरी पुरवठाच होत नसल्यामुळे तसेच संपर्क साधणे कठीण जात असल्यामुळे हा ‘गोलमाल’चा प्रकार तर नव्हे ना असे वाटायला लागले आहे. असे माजी उपनगराध्यक्ष महादेव खानोलकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com