Sadanand Shet Tanavade : ...तर काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपमध्ये घेतलंच नसतं

सदानंद शेट तानावडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Sadanand Shet Tanavade Goa BJP President
Sadanand Shet Tanavade Goa BJP PresidentDainik Gomantak
Published on
Updated on

Sadanand Shet Tanavade : गोव्यात 11 पैकी आठ काँग्रेस आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये आमदारांच्या या बंडामुळे मोठी खळबळ उडाली असतानाच गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. जर या आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा अधिकार माझ्या हातात असता तर मी कधीच त्यांना पक्षात येऊ दिलं नसतं असं वक्तव्य तानावडेंनी केलं आहे. तानावडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसच्या आठ आमदारांनी काल बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आज गुरुवारी विधानसभा सभापतींनी गट विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. मात्र दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी हा निर्णय वरिष्ठांच्या आदेशाने झाल्याचं म्हटलं आहे. जर या आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा अधिकार मला असता तर मी नक्कीच त्यांना कधीही पक्षात घेतलं नसतं असं तानावडेंनी म्हटलं आहे.

केंद्रातील नेत्यांना काँग्रेसचे आमदार भेटले आणि त्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याचं तानावडेंनी स्पष्ट केलं आहे. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर भाजपमध्ये स्थानिक नेतृत्व आक्षेप घेत नसल्याने हा पक्षप्रवेश झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आपण आणि मुख्यमंत्री या आठही काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचंही तानावडे म्हणाले आहेत.

Sadanand Shet Tanavade Goa BJP President
CM Pramod Sawant : ...तेव्हाच गोव्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार

दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही आमदार मायकल लोबो यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरुच राहणार असल्याचंही तानावडेंनी स्पष्ट केलं आहे. कायदेशीर प्रक्रिया कधीही थांबणार नाही. नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी मायकल लोबो यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. किनारपट्टी भागात लोबोंकडून जमिनींचा घोटाळा झाल्याचा आरोप राणेंनी केला होता. टीसीपी खात्याकडून नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेही लोबोंकडे अंगुलीनिर्देश केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरुच राहणार असल्याचं तानावडेंनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com