Manohar Parrikar
Manohar ParrikarDainik Gomantak

CRPF जवानाने माजी CM मनोहर पर्रीकरांना IFFI च्या कार्यक्रमस्थळी प्रवेश करु दिला नाही 'तो' किस्सा

1952 मध्ये सुरु झालेला IFFI महोत्सव 2004 मध्ये गोव्यात दाखल झाला.

IFFI Goa 2023: गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने राज्यातील इफ्फीबाबतच्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत.

1952 मध्ये सुरु झालेला IFFI महोत्सव 2004 मध्ये गोव्यात दाखल झाला, तेव्हापासून गोव्यात इफ्फी आयोजित केला जातो. एकेकाळी जुने गोवा मेडिकल कॉलेज (GMC) कॅम्पस मध्ये इफ्फी आयोजित केला जात होता.

गोव्यात 2004 साली पहिल्यांदा चित्रपट मोहत्सव आयोजित करण्यात आला तेव्हा, राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना एकदा इफ्फीच्या कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. पर्रीकर यांचे निकटवर्तीय आणि पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांनी हा किस्सा सांगितला आहे.

सिद्धार्थ कुंकळ्ळीकर म्हणाले, जीएमसीच्या जीर्ण इमारतीत प्रवेश केला त्यावेळी तिथे साप आणि इतर प्राण्यांचा सामना करावा लागला. 180 दिवसांत मल्टिप्लेक्स कसे बांधले आणि दोन नवीन पूलही त्याच काळात कसे पूर्ण झाले याची आठवण कुंकळ्ळीकर यांनी सांगितली. चित्रपट महोत्सवासाठी पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण कशा होतील याची खात्री पर्रीकर यांनी केली.

Manohar Parrikar
IFFI 2023: बोमण इराणींची डॉक्यु-फिल्म '1947: ब्रेक्झिट इंडिया'चा 'इफ्फी'मध्ये होणारप्रीमियर

राज्यात होणारा इफ्फी महोत्सव सर्वांसाठीच पहिलाच अनुभव होता. मला एक प्रसंग आठवतो एका CRPF जवानाने CM मनोहर पर्रीकर यांना IFFI च्या कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखले होते. साधे राहणीमान असल्याने पर्रीकर खाजगी मारुती 800 कारमधून कार्यक्रमस्थळी आले होते आणि त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते.

पर्रिकर यांनी जवानाला आपण मुख्यमंत्री असल्याचे समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र जवानाने त्यांना आत प्रवेश देण्यास नकार दिला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची शासकीय गाडी घटनास्थळी आली. पर्रीकरांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याने जवानाला ते राज्याचे मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आणि अखेर पर्रीकरांना कार्यक्रमस्थळी जाण्यास परवानगी देण्यात आली, असे कुंकळ्ळीकर म्हणाले.

टेक्नोक्रॅटमधून राजकारणी झालेले पर्रीकर हे गोव्यातील प्रचंड लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व होते. राज्याचे ते चार वेळा मुख्यमंत्री होते तर देशाचे संरक्षणमंत्री म्हणून देखील उत्तम कामगिरी केली होती. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेले पर्रीकर यांचे 2019 मध्ये वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले.

दरम्यान, गोव्यात 20 नोव्हेंबरपासून यावर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु होत आहे. यावर्षी महोत्सवात 270 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com