Pramod Sawant: सावंत सरकारचे गोव्यातील जनतेसाठी धेय्य काय? मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

'काँग्रेसमुक्त भारत', तुम्ही फारच गांभीर्याने घेतलयं...मुख्यमंत्री हसून काय म्हणाले?
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak

गोव्यातील जनतेसाठी कोणते धेय्य प्रमोद सावंत सरकारपुढे आहे. याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले. पांचजन्य सागर मंथन यांच्यावतीने सुशासन संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.

गोव्यासाठी तुम्ही व तुमच्या सरकारने काय धेय्य ठेवले आहे. किंवा कोणत्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत? असे भौतिक लक्ष्य तुमच्या समोर काय आहे? असा प्रश्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्याच्या विकासाचे मूल्यमापन शाश्वत विकास (Sustainable Development Goal) या मुद्यावर केले जाते. 2019 मध्ये माझ्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली तेव्हा राज्य शाश्वत विकासाच्या श्रेणीत सातव्या क्रमांकावर होते तर, आता गोवा चौथ्या क्रमांकावर आहे. यावरून राज्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करता येईल. याशिवाय स्वच्छ पाणी आणि स्वच्छता यात गोव्याला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहे. अक्षय ऊर्जा श्रेणीत शंभर गुण मिळवणारे गोवा हे एकमेव राज्य आहे.

Pramod Sawant
Goa: राज्यात धर्मांतराच्या घटना घडत होत्या, पण... धर्मांतरावरून काय बोलले मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शाश्वत विकासाच्या श्रेणीत पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर पोहोचणे हे आमचे धेय्य आहे. दुसरे म्हणजे पायभूत सुविधा आणि मानव संसाधन निर्मिती हे आमचे धेय्य आहे. नरेंद्र मोदींचे आत्मनिर्भर भारत हे धेय्य आहे त्याचअंतर्गत आम्ही स्वयंपूर्ण गोवा यासाठी प्रयत्न करत आहोत. स्वयंपूर्ण गोवा 1.0 अंतर्गत दहा मुद्दे होते, यात हर घर जल, विज, विमा यासारख्या सुविधा 95 टक्के लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्हाला शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. तसेच, स्वयंपूर्ण गोवा 2.0 अंतर्गत आम्ही कौशल्य विकासावर भर दिला आहे. कौशल्य विकासाचे धेय्य पूर्ण करणे हे आमचे लक्ष्य आहे. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Sawant
Christmas In Goa: नाताळ! गोव्यात येशू जन्माचा उत्साह, राज्य विविधरंगी रोषणाईने उजळले

'काँग्रेसमुक्त भारत', तुम्ही फारच गांभीर्याने घेतलयं का?

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना यावेळी राजकारणावरून देखील प्रश्न विचारण्यात आला. मजबूत लोकशाहीसाठी विरोधी पक्ष देखील मजबूत असणे आवश्यक आहे. देशात 'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा तुम्ही फारच गांभीर्याने घेतली आहे का? असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला.

विरोधी पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे, या विचाराशी सहमत आहे. विरोधक असायलाच हवा. पण, कोणी आमच्या पक्षात येणार असेल तर, आम्ही स्वागत करण्यासाठी तयार आहोत. असे हसतमुखाने उत्तर मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com