Viral Post: 'गोवा' वेगळा देश असता तर..? सोशल मिडियावर रंगलंय चर्चा युद्ध

Goa Tourism Viral Post: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल १४ वर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले.
Debate On What If Goa Was a Country
Goa Tourism Viral PostDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्यटनाच्या जगात वेगळ ठसा उमटवणारे गोवा राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे. १९ डिसेंबर १९६१ रोजी भारताने ऑपरेशन विजय द्वारे गोव्याची पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून मुक्तता केली. भारताच्या तुलनेत १४ वर्षांनी गोव्याला उशीरा स्वातंत्र्य मिळाले.

पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या गोव्यात दरवर्षी लाखो देशी - विदेशी पर्यटक हजेरी लावतात. असा गोवा वेगळा देश होऊ शकतो का? असा विचार गोवा मुक्तीनंतर समोर आला होता. तशीच काही चर्चा आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर रंगली आहे.

रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर यासंबधित एक पोस्ट करण्यात आली आहे. गोवा आज वेगळा देश असता तर? याविषयावर लोकांनी विविध मतं व्यक्त केली आहेत.

काय आहे पोस्ट?

"मला कोणाला वेड्यात काढायचं नाहीये किंवा गोव्याच्या वर्चेस्ववादी लोकांना खुश करायचे नाही. पोर्तुगालपासून मुक्त झाल्यानंतर आपण स्वतंत्र देश होण्याचा प्रयत्न केला असता तर काय झाले असते? मला माहित आहे की आपण अनेक गोष्टींसाठी भारतावर विसंबून आहोत. पण आमच्यात सामायिक लष्करी हितसंबंध असलेल्या EU (युरोपियन युनियन) देशांसारखे संबंध असू शकले असते. जेव्हा जेव्हा मी यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असे आढळले की, लोकांना गोमंतयकीय वर्चस्व किंवा ज्यांना राष्ट्राचा प्रचंड अभिमान आहे, असे लोकच धावून आले."

Debate On What If Goa Was a Country
Goa Politics: ‘आप’चे ‘एकला चलो’ धोरण काँग्रेस पक्षावर दबावासाठीच! शक्ती आजमावण्याचा प्रयत्न, विश्लेषकांचे मत

लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या?

"भूतान, मालदीव आणि नेपाळ हे वेगळे देश आहेत, पण व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी ते भारतावर अवलंबून आहेत. गोव्याची स्थिती देखील फार वेगळी नसती. तुमच्याकडे पर्यटकांचा ओघ तेवढाच असता, पण तुमच्याकडे केंद्र सरकारचा निधी मिळवता नसता आला. आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज मिळवता नसते आले. तुम्हाला वाटते की EU ने तुम्हाला वाचवले असते, तर प्राचीन काळातील सुमेरमध्ये तुम्हाला विकण्यासाठी माझ्याकडे काही तांबे आहेत", अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

Reddit Post
Reddit PostDainik Gomantak

"मी गोव्याचा नाहीये. पण गोवा १९६१ साली भारतात सामील झाला. आणि १९७१ साली बांगलादेश युद्ध झाले. विभाजन संबधित घडामोडीसाठी गोव्याची जमीन वापरली जाऊ शकली असती", असे मत आणखी एका युझरने व्यक्त केले आहे.

"गोव्याचा स्वातंत्र्यलढा भारतीय (ब्रिटिश) स्वातंत्र्यलढ्याइतका धार्मिक कलहांनी ग्रासलेला नव्हता नव्हता. त्याऐवजी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी (सर्व धर्माचे) त्यावेळी सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या भारतीय बाजू घेणे महत्वाचे समजले. म्हणूनच भारताचा एक भाग म्हणून लढा दिला", असे दुसऱ्या एका युझरने या व्यक्तीला दिले आहे.

Reddit Post
Reddit PostDainik Gomantak
Debate On What If Goa Was a Country
Goa Weather: लाहीलाही! मार्चमधील तिसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद; वायुप्रवाह बदलांमुळे उष्मा अधिक

"गोवा 1961 मध्ये भारतात सामील झाला. हाच सुधारणावाद आहे. गोवा भारतात विलीन झाला आणि 1974 पर्यंत अनेक आघाड्यांवर विवादित प्रदेश राहिला त्यानंतर पोर्तुगाल आणि भारताने एक करार केला, सालाझारच्या मृत्यूनंतर संबंध पुन्हा प्रस्थापित केले. या परिस्थितीमध्ये भारताचा वरचष्मा असण्याचे एकमेव कारण म्हणजे पूर्वीच्या यूएसएसआरने (सोविएत युनियन) सुरक्षा परिषदेत भारताच्या बाजूने मांडलेल्या प्रत्येक गोष्टीला सतत व्हिटो देण्यात आला", अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

Reddit Post
Reddit PostDainik Gomantak

गोव्यातील नेते टी. बी. कुन्हा, ज्युलियाव मेनेझिस, पुरुषोत्तम काकोडकर आणि गोवा काँग्रेस, आझाद गोमंतक दल युनियनमध्ये सामिल होण्याच्या बाजूने होते, असे मत दुसऱ्या एका युझरने मांडले आहे.

दरम्यान, पोर्तुगिजांनी गोव्यातील तिसवाडी, बार्देश, साष्ट (सासष्टी) या तीन तालुक्यांवर सुमारे ४५० वर्षे राज्य केले. त्यानंतर उरलेल्या तालुक्यांमध्ये हळूहळू विस्तार केला. या काळात पोर्तुगिजांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केला. धर्मांतरासाठी अत्याचार केल्याची इतिहासात नोंद आहे. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील मुक्तीसंग्रामाला बळ मिळाले. गोमंतकीय जनता स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरली आणि अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com