
Former PM Manmohan Singh passed away
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री ९.५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) संध्याकाळी बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत होते. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दिल्लीत परतले आहेत. दोन्हीही बेळगाव येथे होणाऱ्या महामोर्चानिमित्त बेळगावात होते.
एम्सने मेडिकल बुलेटीनद्वारे मनमोहन सिंग यांच्या निधनाची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी मनमोहन यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करुन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.