पणजी: गतवर्षी मार्चमध्ये युरोपातील (Europe) बुद्धिबळ (chess) स्पर्धेत खेळण्यास गेलेला गोव्याचा युवा बुद्धिबळपटू लिऑन मेंडोंसा वडिलांसमवेत कोरोना विषाणू (Covid-19) महामारी निर्बंधामुळे तेथेच अडकला. त्या कालावधीत आवश्यक तिन्ही नॉर्म मिळवून त्याने देशाचा 67वा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू हा मान मिळविला, पण मायदेशी परतण्यासाठी त्याला तब्बल दीड वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
अखेरीस लिऑन आणि त्याचे वडील लिंडन यांचे गुरुवारी आगमन झाले. त्यावेळी त्यांचे राज्यातील बुद्धिबळप्रेमींनी जोरदार स्वागत केले. दाबोळी विमानतळावर तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना, तसेच गोवा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी, बुद्धिबळप्रेमी त्याच्या स्वागतास उपस्थित होते.
लिऑन हा गोव्यातील सर्वांत युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस इटलीतील स्पर्धेत त्याने या किताबासाठी आवश्यक तिसरा नॉर्म प्राप्त केला. कोविड-19 लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून युरोपात अडकल्यानंतर तेथील स्पर्धेत खेळत त्याने स्वप्नपूर्ती केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.