आझादनगरी खून प्रकरण: संशयित विनोदकडून नकल डस्टर जप्त

सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी
Muktar Badani's murder
Muktar Badani's murderDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: वाढदिवसाला बोलविले नाही या क्षुल्लक कारणावरून आझादनगरी मडगाव येथे राहणाऱ्या मुक्तार बदानी (25) या युवकाचा खून करणाऱ्या विनोद जलगार याच्याकडून मडगाव पोलिसांनी खून करण्यासाठी वापरलेला नकल डस्टर जप्त केला. दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना आज रिमांड घेण्यासाठी. मडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. पाच जणांनी हल्ला केल्याने त्यात त्याचा खून झाला. हल्लेखोरांनी रागाच्या भरात तीन दुचाक्यांनाही आग लावली होती. (Weapon for Muktar Badani's murder in Margao seized from suspect )

Muktar Badani's murder
मुंडवेल वास्को येथील राष्ट्रीय महामार्गाला पुन्हा भगदाड

या प्रकरणात पोलिसांनी त्याच वस्तीत राहणारे विनोद जलगार (30), सुरेश जलगार (29), अक्षय भोवे (24), आसिफ नागरची (29) व कालकोंडा येथील महंमद हुसेन शेख (31) या पाच संशयितांना अटक केली होती. मडगावचे पोलीस निरीक्षक फिलोमेना कॉस्ता हे या प्रकरणी तपास करीत आहेत. आज मडगाव पोलिसांनी संशयित विनोद याला कडक पोलीस बंदोबस्तात आझाद नगरीत आणले असता त्याने या खुनासाठी वापरलेला नकल डस्टर पोलिसांना दाखविला. याच डस्टरने वार केल्याने मुक्तार ठार झाला होता.

Muktar Badani's murder
खेलो इंडिया खेळाडूंकडून आता पदकांची अपेक्षा

मयत मुक्तार याचा 14 जुलै रोजी वाढदिवस असल्याने रात्री 12 वाजता तो आणि त्याचे मित्र केक कापण्यासाठी जमले असता तेथे विनोद व त्याचे अन्य चार साथीदार आले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलविले नाही या शुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. यावेळी विनोदने मुक्तारवर प्रहार केल्याने तो खाली कोसळला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा चुलतभाऊ आला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.

या नंतर त्यांनी तीन दुचाकी पेटवून दिल्या. त्यामुळे या वस्तीत एकच गोंधळ उडाला. जखमी झालेल्या मुक्तारला तातडीने हॉस्पिसियो इस्पितळात हलविण्यात आले तिथे त्याला मृत जाहीर करण्यात आले होते. मयत मुक्तार हा गांधी मार्केटात एका कपड्यांच्या दुकानांत सेल्समन म्हणून काम करत होता. या वस्तीत नेता असलेल्या सिकंदर खान याला तो जवळ होता. ज्या आरोपींनी हा हल्ला केला ते सिकंदर याच्या विरोधात असून त्याच वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा असे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com