खेलो इंडिया खेळाडूंकडून आता पदकांची अपेक्षा

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते राज्य उत्कृष्टता केंद्र कार्यान्वित
Govind Gaude at Campal
Govind Gaude at CampalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, आता आम्हाला खेळाडूंकडून समर्पक निकाल व पदकांची, तसेच देशातील क्रीडा क्षेत्रात गोवा पहिल्या पाच राज्यांत असावे ही अपेक्षा असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी केले.

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उत्कृष्टता योजनेअंतर्गत गोव्यातील केंद्र देशात तेरावे ठरले. या केंद्राचे क्रीडामंत्री गावडे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. कांपाल येथे या योजनेअंतर्गत बॅडमिंटन, टेबल टेनिस व जलतरण प्रशिक्षण केंद्र निवासी धर्तीवर कार्यरत असेल.

क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रांतर्गत दर्जेदार मार्गदर्शक, प्रशिक्षक, तंदुरुस्ती प्रशिक्षक, फिजिओथेरापिस्ट, तसेच अन्य क्रीडाविषयक तज्ज्ञ उपलब्ध झाले आहेत. आम्ही सुविधा पुरविण्यासाठी तत्पर आहोत. त्याचा लाभ घेत गोमंतकीय खेळाडूंनी मैदानावर इतिहास घडवावा. आम्हाला आता निकाल हवे आहेत. क्रीडा क्षेत्रात गोवा पहिल्या पाच राज्यांत असावा ही आमची अपेक्षा आहे. अपेक्षित निकाल लगेच मिळणार नाहीत, मात्र येत्या येत्या काही वर्षांत निश्चितच अधिकाधिक पदके मिळण्याची आशा आहे.’’

खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्र उद्‍घाटन सोहळ्यास पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, क्रीडा सचिव अजित रॉय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विभागीय संचालक सुश्मिता ज्योत्सी, क्रीडा संचालक अजय गावडे यांची उपस्थिती होती.

Govind Gaude at Campal
...तरच गोव्यात पोलिसांना वाहनं अडवता येणार!

अखेर दोन वर्षे विलंबाने कांपाल तलावावर जलतरणपटू

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने कांपाल येथील जलतरण तलावाचे नूतनीकरण गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आले होते. मार्च-एप्रिल 2020 मध्ये हे काम पूर्ण होऊन ते जलतरणपटूंसाठी उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र काम लांबत गेले आणि पणजी परिसरातील जलतरपटूंना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. अखेरीस दोन वर्षे विलंबाने कांपाल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव खुले झाले. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी त्याचे उदघाटन केले. नूतनीकरण झालेल्या जलतरण तलावावर अत्याधुनिक विद्युतझोत व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. सुरवातीस जलतरण तलावावर फक्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धक सराव करतील, कालांतराने हा प्रकल्प सर्वांसाठी खुला होईल, अशी माहिती क्रीडामंत्र्यांनी दिली.

खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्राविषयी

- कांपाल-पणजी हे एकंदरीत देशातील 13वे केंद्र

- निवासी आणि शैक्षणिक सुविधांसह प्रशिक्षण योजना

- बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण या खेळातीस प्रत्येकी 30 असे एकूण 90 खेळाडू

- आंतरराष्ट्रीय पातळीवरील माजी जिम्नॅस्ट तिरुअनंतपुरम-केरळ येथील एम. आर. सुमीत गोवा केंद्राचे उच्च कामगिरी उत्कृष्टता संचालक

- बॅडमिंटनसाठी गुलबर्गा-कर्नाटक येथील इरफान खान प्रशिक्षक

- इंफाळचे (मणिपूर) उपेंद्रो सिंग टेबल टेनिससाठी प्रशिक्षक

- जलतरण प्रशिक्षकाची नियुक्ती लवकरच

- कपिलदेवसिंग संधू तंदुरुस्ती (स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग) प्रशिक्षक, तर डॉ. मेलिसा पर्ल लुईस फिजिओथेरापिस्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com