वास्को: घाणेरडे राजकारण करण्यासाठी काही टुरिस्ट गोव्यात आले आहेत.आपण बरे काय आणि वाईट काय हे ओळखून घाणेरडे राजकारण करण्यासाठी आलेल्यांना हाकलून लावले पाहिजे.या लोकांनी हिंसाचार माजवला आहे.आमची गोवेकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला असून त्यापुर्वीच सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.त्यांना गोवेकरांचा पुळका कधी आला.त्यांनी स्वताची पोळी भाजण्यासाठी गोव्यात शिरकाव केला आहे, असे प्रतिपादन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Mauvin Godinho) यांनी केले.
चिखली पंचायत मैदानावर उपजिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी आणि उपदंडाधिकारी मुरगावतर्फे आयोजित गोवा मुक्तिदीनाच्या (Goa Liberation Day) कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई, पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई, मामलेदार रघुनाथ देसाई, पोलीस निरीक्षक नीलेश राणे, चिखली सरपंच व पंच सदस्य तसेच उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयातील कर्मचारी व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना गुदिन्हो म्हणाले की,ज्या हुतात्म्यांनी प्राणाची आहुती देऊन गोवा मुक्त केला त्या हुतात्म्यांचे स्मरण करणे आमचे कर्तव्य आहे. खासकरून आजच्या तरूण पिढीने या हुतात्म्यांचा बोध घ्यावा. गोवा (Goa) मुक्ती लढ्यात या थोर स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान देऊन गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त केला. गोवेकर खरे कलाकार असून आज आम्ही तुमच्याच बळावर विकासाची पावले मारतो. आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत डबल इंजिन सरकार पाहिजे.आम्हाला खूनी राजकारणी गोव्यात नको.
आमचा गोवा शांतता पुर्ण वातावरणात आहे.आता बाहेरचे पक्ष येऊन गोव्याला मलिन करण्याच्या विचारात आहे.तेव्हा आम्हाला असले आत्मघातकी गोव्यात नको. केंद्र सरकार व राज्य सरकार (State Government) मिळून गोव्याचा विकास करीत आहे. तेव्हा हेच डबल इंजिन सरकार गोव्यात आणूया असे आवाहन गुदिन्हो यांनी केले. मायनिंग बंद पडल्याने गोव्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. मात्र त्याची उणीव पर्यटनात भरून काढली आहे. गोवा हे पर्यटन स्थळ असून गोवा पर्यटनावर अवलंबून आहे.
सुरुवातीला प्रमुख पाहुणे माविन गुदिन्हो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंर पोलीस दल शालेय विद्यार्थ्यांची परेड पाहणी केल्यानंतर मानवंदना स्वीकारली.गोवा मुक्ती दिनानिमित्त संबोधित केल्यानंतर नौदल बॅण्ड तसेच शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.