डिचोलीत विविध रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण
डिचोली: डिचोलीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मतदारसंघातील रस्त्यांची सुधारणा करण्यावर भर दिला आहे. निवडून येताच त्यांनी विकासकामांचा धडाका सुरु करताना आतापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक रुपये खर्च करून बंदरवाडा-डिचोलीसह कुमयामळ-साळ खरपाल आणि सावरधाट येथील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण काम हाती घेतले आहे.
सुमारे 26 लाख रुपये खर्चून मुख्य रस्ता ते खरपाल गावापर्यंतच्या अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण काम हाती घेण्यात आले आहे. आमदार डॉ. शेट्ये यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी लाटंबार्से-कासारपालचे सरपंच ज्ञानेश्वर गावस , उपसरपंच यशवंत वरक, माजी पंच पद्मा मळीक, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे अभियंता रश्मी मयेकर आणि डी. गावकर तसेच गौरीश गावस, रामा गावस, दिप्तेश गावस, अनिश गावस, अनंत गावस,सर्वेश गावस, अवधूत गावस,विष्णू गावस, अजय गावस दीपक गावस आदी नागरिक उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.