Passport
PassportDainik Gomantak

Passport Issue: पासपोर्टचा विषय केंद्राकडे; सदानंद तानावडे

Passport Issue: नरेंद्र सावईकर: उपाययोजनेस होणार थोडा उशीर
Published on

Passport Issue: पासपोर्टचा प्रश्न प्रश्र्न आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचविला असून कायदेशीररीत्या हा थोडा जटील प्रश्र्न आहे. त्यामुळे उपाययोजनेस थोडा उशीर लागू शकतो. राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनीसुद्धा हा प्रश्र्न राज्यसभेत मांडलेला आहे. हा प्रश्र्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,

Passport
Colva Pay Parking: कोलवा पे पार्किंग म्‍हणजे स्‍थानिकांची लूट

भाजपचे राज्य सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी आज येथे सांगितले. ज्या 70 जणांनी पासपोर्टच्या नुतनीकरणासाठी अर्ज केले होते, ते रद्द करण्यात आले आहेत. कारण त्यांचा जन्म पोर्तुगालचा आहे. यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर आज मडगावात पत्रकारांना दिले.

पुढील वर्षी 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केल्याचे राज्य सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की निवडणुकीसाठीची पक्षाची रचना करण्याचे काम हातात घेतले असून बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. शिवाय मंत्री, आमदारांवरही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत.

पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार

दक्षिण गोव्यात उमेदवारीसाठी इच्छुक आहे का असे विचारले असता नरेंद्र सावईकर यांनी सांगितले, की आम्ही पक्षाचे कार्यकर्ते असून पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास आपली तयारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com