Colva Pay Parking: कोलवा पे पार्किंग म्‍हणजे स्‍थानिकांची लूट

Colva Pay Parking: गिरीश चोडणकर यांचा आरोप: महसुलासाठी सरकारकडे दूरदृष्टी नाही
pay and park
pay and park Dainik Gomantak

Colva Pay Parking: कोलवासारख्‍या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्‍यावर पे पार्किंग सुरू करून गोवा सरकार गोव्‍यातील सामान्‍य लोकांची लूटमार करू पाहात आहे, असा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला असून गोव्‍याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडे महसूल मिळवून देण्याची कोणतीही योजना किंवा दूरदृष्टी नाही,

pay and park
Panjim Smart City: ‘स्मार्ट सिटी’ची ऐशीतैशी...

कुठल्‍याही प्रकारची दूरदृष्‍टी नसल्‍यामुळेच सरकार पे पार्किंगच्‍या माध्‍यमातून महसूल गोळा करू पाहात असल्‍याचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजप सरकार आपली लोकविरोधी धोरणे लादून स्थानिकांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा आवाज दाबण्यात गुंतले आहे. फक्त कोलव्यातील लोकांनीच नाही, तर स्थानिक पंचायतीनेही कोलवा समुद्र किनारा परिसरात पार्किंगसाठी शुल्क आकारण्याच्या सरकारच्या योजनेवर आक्षेप घेतला आहे.

pay and park
CM Pramod Sawant: मुंडकार खटले आणखी वेगाने निकाली काढणार

स्थानिकांना चांगले माहीत आहे की, पे पार्किंगची अंमलबजावणी झाल्यास त्यांच्या व्यवसायाचे नुकसान होईल. तथापि, हे सरकार खूप हट्टी आहे. ग्रामसभेत कोलवा बीचवरील प्रस्तावित पे पार्किंगला कोलवा ग्रामस्थांचा एकमुखी विरोध दिसून आला आहे. कोणतीही गोष्ट एकतर्फी लादण्याआधी सरकारने संवादाला सुरवात करावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

गोवा हे भाजपचे ‘एटीएम’

हे सरकार दोन गोष्टींसाठी ओळखले जाते, एक म्हणजे इव्‍हेंट आयोजन आणि दुसरे म्हणजे एकूण कमिशनसाठी. गोवा हे भाजप पक्षाचे एटीएम मशीन बनले आहे. इतर पक्षांचे आमदार खरेदी करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी ते गोव्‍यातील पैशांचा वापर करतात. आता लोकसभा निवडणूक जवळ आल्याने ते ‘एम’ व्‍हिटामिन मिळविण्यासाठी असे उपाय घेतले जात आहेत, असा आरोप चोडणकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com