Economy: 9 वर्षांत भारतात परिवर्तनाची लाट- केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर

अर्थव्यवस्थेत भारत लवकरच तिसऱ्या स्थानावर
India
IndiaDainik Gomantak

Economy गत 9 वर्षांत भारतात आर्थिक, तंत्रज्ञान व प्रशासनाच्या दृष्टीने परिवर्तनाची लाट आली आहे. देशात राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. पूर्वी राजकारण म्हणजे संधिसाधू, सत्ता व शोषण असाच अर्थ काढला जात होता.

आता राजकारणाची संकल्पना जनसेवा अशी झाली आहे. पूर्वी भारत देश विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून होता. आता आम्ही जगासाठी तंत्रज्ञान तयार करीत आहोत, असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

‘संपर्क से समर्पण अभियानां’तर्गत आज चाड्डेवाडो, दवर्ली येथील डिकॉस्ता हाउसला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, माजी आमदार दामू नाईक, जिल्हा परिषद सदस्य परेश नाईक, भाजपचे राज्य पदाधिकारी सर्वानंद भगत, नावेलीचे प्रभारी चंदन नायक, स्थानिक पंच साईश राजाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

India
Fisheries Union: बोटींच्या नुकसान भरपाईपायी मच्छिमारांनी केलीय 'एवढ्या' रकमेची मागणी

भारताच्या युपीआय तंत्रज्ञानासाठी १७ देशांतून मागणी आली आहे. जे सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत ९ वर्षांत २९ लाख कोटी रुपये थेट पोहोचलेले आहेत. पूर्वी १०० रुपयांपैकी केवळ १५ रुपये लाभार्थ्यांपर्यंत पोचत असत.

भारतात आधुनिक साधनसुविधांची झपाट्याने वाढ झाली आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, रेल्वे स्टेशन, आरोग्य सेवा, शाळा, इस्पितळांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले.

India
Goa Congress: कायमस्वरूपी जागा देऊन कोकणी अकादमीवरील राजकारण थांबवा

‘आयटी प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न’

केंद्र सरकारच्या नव्या आयटी धोरणाचा फायदा गोव्याला मिळणार असून दक्षिण गोव्यात एक मोठा आयटी प्रकल्प स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, अशी माहिती आयटी खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

चंद्रशेखर यांनी आज मडगाव येथे बुध्दीजिवी वर्गाशी चर्चा केली. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांची त्यांनी यावेळी माहिती दिली. त्यात शिक्षण क्षेत्राचाही सामावेश होता. २०२४ साली केंद्र सरकार ठरल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून त्यापूर्वी सर्व योजना आम्ही मार्गी लावू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत राज्याचे माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांच्यासह प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार दिगंबर कामत, उल्हास तुयेकर, संकल्प आमोणकर तसेच अन्य नेत्यांनी भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com