Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

Water Shortage : दरम्‍यान, तयडे गावात अजूनही पाण्याचा टँकर पोहचला नसल्याले लोक टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
Water Shortage
Water Shortage Dainik Gomantak
Published on
Updated on

Water Shortage :

तांबडी-सुर्ला, पानसी व सातपाल-साकोर्डा येथील जलप्रकल्प योजनेअंतर्गत बसविलेले पंप सुरू करुन सुर्ला, मधलावाडा, बाराभूमी हायस्कूल परिसर व बोळकर्णे येथील लोकांना काल संध्याकाळी उशिराने पाणीपुरवठा करण्यात आला.

दरम्‍यान, तयडे गावात अजूनही पाण्याचा टँकर पोहचला नसल्याले लोक टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

बट्टर, धारगे व तांबडी-सुर्ल भागात टँकरने नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या भागात दोन टँकर लोकांना सेवा देत असूनही बोरियाळ व मेस्तवाडा येथे दोन दिवसातून एकदा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पाण्याची कमतरता भासत असते.

Water Shortage
Goa SSC Result: दहावीतही मुलींचा टक्का वाढला; शाळांच्या हलगर्जीपणामुळे 97 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

मधलावाडा-साकोर्डा येथील जलप्रकल्प शनिवारी ग्रामस्थांनी जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडल्याने संबंधित गावात तीव्र पाणीसमस्या निर्माण झाली होती. धारबांदोडा येथील पाणी विभागाने आज दोन टँकरची व्यवस्था करुन गावात पाणीपुरवठा केल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला.

गावातील विहिरीसुद्धा दूषित

तयडे गावात एक जुनी विहीर आहे. यापूर्वी गावातील लोक या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होते. गेल्या वर्षापासून विहिरीच्या पाण्याला वास सुटल्याने लोकांनी हे पाणी वापरणे कायमचे सोडले. काही मोजके लोक पाणी उकळून वापरत असल्याचे समजते. या गावात मिनरल फाऊंडेशनची एक विहीर आहे.

पण त्या विहिरीच्या पाण्यात गढूळपणा असल्याने लोक ते पाणी स्वयंपाक व पिण्यासाठी वापरत नाही. गावातील अधिकाधिक लोक ४-५ किलोमिटर दूर असलेल्या तांबडीसुर्ल, धारगे व बोळकर्णे येथील विहिरीच्या पाण्याकडे धाव घेतात व ते पिण्यासाठी वापरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com