गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.३८ टक्के लागला आहे. शाळांनी अंतर्गत गुण आणि श्रेणी न कळविल्याने विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना मंडळाला ९७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवावा लागला आहे.
परीक्षेसाठी १,९५५ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ जणांनी माघार घेतली होती. नेहमीप्रमाणे मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आहे. या परीक्षेत ९,३१८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८,५५५ उत्तीर्ण झाले, तर ३८ जणांचा निकाल राखीव ठेवला आहे. विद्यार्थ्यांचा निकाल ९१.८० टक्के लागला. ९,५९६ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. पैकी ८,९१८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ५९ जणींचा निकाल राखीव ठेवला असून हा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे.
ही परीक्षा राज्यभरातील ३१ परीक्षा केंद्रांवर १ ते २४ एप्रिलदरम्यान घेण्यात आली होती. यापैकी नेत्रावळी हे केंद्र दुर्गम भागात होते. व्यावसायिक पूर्व अभ्यासक्रम घेऊन दिलेली ही शेवटची परीक्षा होती. पुढील वर्षी हे विषय ‘एनएसक्युएफ’ यंत्रणेशी जोडले जाणार आहेत.
राज्यातील १२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
यंदा ४६४ दिव्यांगांनी परीक्षा दिली होती. पैकी ४०७ जण उत्तीर्ण झाले. हा निकाल ८७.७२ टक्के लागला. विशेष मुलांसाठी राज्यात ४ विद्यालये आहेत. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सूट, उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वाढीव वेळ, मोठ्या अक्षरांतील प्रश्नपत्रिका आदी सुविधा दिल्या होत्या.
पर्वरीच्या संजय विशेष मुलांसाठीच्या केंद्राचा आणि जुने गोवे येथील सेंट झेवियर अकादमीचा निकाल १०० टक्के लागला. ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विराणी इसानी कर्णबधीर विद्यालयाचा निकाल ५० टक्के, तर ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या आय. जे. विराणी आणि एन. आय. विराणी दृष्टीहीनांच्या विद्यालयाचा निकाल ६० टक्के लागला.
२६३ जण क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण
एनएसक्यूएफ योजनेंतर्गत सातवा विषय घेऊन ४५८ जण उत्तीर्ण झाले. २६३ जण क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांची वर्गवारी
सर्वसाधारण ओबीसी एससी एसटी एकूण
बसलेले १३,६०३ २,९२० ३८२ २,००९ १८,९१४
उत्तीर्ण १२,४७० २,७६४ ३४४ १,८९५ १७,४७३
सुधारण्याची गरज ३७७ ४५ १२ ४२ ४७६
एटीकेटी ६८७ १०१ २१ ६० ८६९
राखीव ६९ १० ६ १२ ९७
उत्तीर्ण टक्केवारी ९१.६७ ९४.६६ ९०.०५ ९४.३३ ९२.३८
तालुकावार निकाल
तालुका बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
बार्देश ३,३२१ ३,०२७ ९१.१५
डिचोली १,२१३ १,१२९ ९३.०८
काणकोण ६६३ ६३० ९५.०२
धारबांदोडा ३२४ २८३ ८७.३५
केपे १,०१९ ९१८ ९०.८६
मुरगाव १,६६३ १,५११ ९०.८६
पेडणे ९२२ ८६९ ९४.२५
फोंडा २,२८५ २,१५५ ९४.३१
सासष्टी ३,९८२ ३,७३६ ९३.८२
सांगे ४०४ ३६२ ८९.६०
सत्तरी ७१८ ६५४ ९१.०९
तिसवाडी २,४०० २,१९९ ९१.५८
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.