मोरजी: तुये पंचायत क्षेत्रात मुरमुसे परिसरात पाण्याची समस्या गंभीर असून, कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने नळांना पाणीपुरवठा होत नाही. तो पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करणारे निवेदन तुयेचे पंच आनंद साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पेडणे पाणी विभागाचे अभियंता संदीप मोरजकर यांना सादर केले. (Goa Water Shortage)
तुये मुरमुसे या ठिकाणी पाणीपुरवठा योग्य रीतीने होत नाही. कमी दाबाचा पाणीपुरवठा होत आहे. कोरगावच्या बाजूने भालचंद्र कलंगुटकर ते प्रकाश पोळजी यांच्या घरापर्यंतच्या लाईनमध्ये बिघाड असून, पाणीपुरवठा कमी दाबाचा असतो.
मुरमुसे भागासाठी पाणी (Water) पुरवठ्याची वेळ निर्धारित केलेली होती. पण, या वेळेप्रमाणे पाणीपुरवठा अनियमित, कमी दाबाचा होतो. यासंबधी ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत मंडळ ग्रामस्थ, ग्रामविकास समिती स्वयंपूर्ण मित्र, पाणी अभियंता यांनी यासंबधी योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. नागरिकांनी (Citizens) दिलेल्या निवेदनाला पंचायतीमध्ये मांडलेल्या ठरावाची प्रत जोडण्यात आली आहे. या भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. दरम्यान तुये परिसरात ज्या प्रमाणे पाणी समस्या आहे त्याचप्रमाणे मोरजी मांद्रे हरमल कोरगाव या भागालाही पाणी समस्या जाणवत आहे.
दोन टाक्या बिनकामाच्या
पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या दोन टाक्या आहेत, त्या त्यात सोडण्यात आलेले पंप हे कमी क्षमतेचे असल्यामुळे पुरवठा आणि दाबावर त्याचा परिणाम होतो. पाण्याच्या दोन्ही टाक्यांमध्ये भरपूर गाळ माती असून त्यातील गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे दोन टाक्या असून नसल्यासारख्या आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.