खाणपट्ट्यातील युवकांना हवा रोजगार

उच्च शिक्षितांना नोकरीची प्रतीक्षा, मुख्यमंत्री प्रयत्नशील
Goa Mining खाणपट्ट्यातील युवकांना हवा रोजगार
Goa Mining खाणपट्ट्यातील युवकांना हवा रोजगारDainik Gomanatak

पाळी : खाण पट्ट्यातील (Goa Mining) उच्च शिक्षित युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असून उच्च शिक्षण घेतलेल्या येथील युवकांच्या हातांना काम मिळवून देण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्यातील खनिज खाणी बंद झाल्यानंतर रोजगारावर आफत आली असून खाण भागातील उच्च शिक्षित युवकही बेकार बनले आहेत. त्यामुळे या युवावर्गाला सरकारी नोकऱ्या तसेच खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून सरकारने त्वरित रोजगार उपलब्ध करावा, अशा प्रतिक्रिया खाण भागातून व्यक्त होत आहेत.

Goa Mining खाणपट्ट्यातील युवकांना हवा रोजगार
अग्निशमन संचालकपदी पहिल्यांदाच 'गोमंतकीय अधिकारी'

राज्यातील खाण अवलंबित सध्या खाणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बार्जचे हॉटेल्‍समध्‍ये परिवर्तन करा, असा सल्ला देऊन त्‍याबाबत अनिश्‍चितता व्‍यक्त केली आहे. त्‍यामुळे खाण अवलंबितांना रोजगार कसा देणार, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. सरकारने त्‍यावर तोडगा काढणे आवश्‍‍यक आहे.

गेल्या 2012 व त्यानंतर 2018 मध्ये खनिज खाणी बंद झाल्यामुळे येथील रोजगारावर थेट परिणाम झाला आहे. मध्यंतरीच्या काळात लिलावाचा खनिज माल तसेच स्वामित्व धन अदा केलेल्या खाणींवरील खनिज मालाची वाहतूक करण्यात आली. मात्र, ती तात्पुरती व तुटपुंजी असल्याने खाणी कायमस्वरुपी सुरू करण्यासाठी योग्य कार्यवाही व्हावी, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Goa Mining खाणपट्ट्यातील युवकांना हवा रोजगार
मुरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर विरजण

आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी खाण भागातील पालकांनी पोटाला चिमटा काढून महागडे शुल्‍क भरून मुलांना शिकवले आता त्यांना योग्य रोजगार मिळावा, अशी अपेक्षा या पालकांकडून व्यक्त होत आहे. खाणींवर विसंबून असलेल्यांना गाडे, हॉटेल, दुकाने, सुटेभाग विक्रीवाले, गॅरेज तसेच इतर व्यवसाय ठप्प झाला आहे.

लवकरच तोडगा काढावा

राज्याचे मुख्यमंत्री तथा खाण भागाचे प्रतिनिधीत्व करणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून खाणी सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. खाण महामंडळाद्वारे खाणी सुरू करण्यासाठी ही कार्यवाही सुरू आहे, मात्र या खनिज खाणी मूळ मालकांच्या ताब्यात असल्याने पुढील कार्यवाहीबाबत सरकारच्या खाण खात्याने तत्परतेने कार्य करावे, असे मत खाण भागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com